Hundreds of trees were cut down at Chandwad 
नाशिक

निसर्गप्रेमी हळहळले! विकासाच्या नावाखाली कत्तल; चांदवडकरांच्या सुख-दुःखांचे साक्षीदार 'वड' जमीनदोस्त

हर्षल गांगुर्डे/भाऊसाहेब गोसावी

नाशिक/चांदवड : नावातच 'वड' असणाऱ्या चांदवड तालुक्यातील शेकडो वडांच्या झाडांवर कुऱ्हाड पडल्याने समस्त चांदवडकर, निसर्गप्रेमी हळहळताना दिसले. निमित्त ठरलं चांदवड-मनमाड रस्त्याचं विस्तारिकरण. विकासाच्या गोंडस नावाखाली डेरेदार वृक्षांची कत्तल झाली. चांदवडकरांच्या कैक सुख-दुःखांचे साक्षीदार असलेले महाकाय वृक्ष जमीनदोस्त झाल्याने प्रत्येकालाच हुरहूर लागली.

शेकडो झाडांची कत्तल

चांदवड-मनमाड रस्ता कायम चर्चेत राहिला तो खड्डे अन खड्यामुळे झालेल्या अपघातामुळे. रस्त्याची दुरवस्था बघून सर्वपक्षीय आंदोलनेही झालीत पण 'आभाळ फाटलं त्याला ठिगळं कोठून लावणार' म्हणत डागडुजी वरती मजल गेली नाही. अखेर चौपदरीकरण रस्त्यास मंजुरी मिळाली आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. या रस्त्याचे काम उत्कृष्टपणे होईल की नाही हे येत्या काळात दिसेल मात्र रस्ता विस्तारिकरण प्रक्रियेत मात्र शेकडो झाडांची कत्तल झाल्याने अनेक निसर्गप्रेमी दुखावले आहेत. 

अनेक नियम पायदळी​

विकासाच्या प्रक्रियेत झाडांची कत्तल अपरिहार्य असली तरी चांदवड-मनमाड रस्त्यावरील झालेल्या झाडांच्या कत्तलीत अनेक 'अर्था' ने अनियमितता झालेली आढळून आली. याबाबत जीवन नागरी पर्यावरण प्राणी संरक्षण संस्थेचे सचिव विलास संसारे यांच्या मदतीने दै. 'सकाळ' ने पाठपुरावा केला असता, विकासाची प्रक्रिया राबविताना पर्यावरण संरक्षनाचे अनेक नियम पायदळी तुडविल्याचे उघड झाले. 

याबाबत आमच्या प्रस्तुत प्रतिनिधी ने चांदवड चे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार यांच्याशी संपर्क साधला असता, आत्तापर्यंत ज्याही वृक्षांची तोड झाली त्यापैकी ऐंशी टक्के झाडे ही चांदवड नगरपरिषद हद्दीतीलचं आहेत, याच हद्दीत जास्त मोठी झाडे होती. झाडे तोडताना वनविभागाकडून कुठलीही अनियमितता झाली नसल्याचे सांगण्यात आले मग अनियमितता झाली कुठे...? (वाचा क्रमशः)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

हेल्मेट नसताना दुचाकी भरधाव वेगात पळवली; वाटेतच डंपरची धडक बसली अन्... तरुणाच्या डोक्याची झालेली दशा पाहून नागरिकांचं काळीज चिरलं

Trending News : रात्रभर बाईक चालू ठेवली; घरात विषारी धूर..एकाच कुटुंबात ४ व्यक्तींचा गुदमरून मृत्यू, राज्यभर खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

SCROLL FOR NEXT