नाशिक

Nashik Crime News: पत्नीच्या खुनानंतर पतीने उचलले टोकाचे पाऊल; पत्नीच्या चारित्र्यावर संशय

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News: परसूल येथील पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (husband ends life after killing wife nashik news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परसूल येथील भाऊसाहेब बरकले (३५) आणि पत्नी सुनीता (३०) यांच्यात नेहमी वाद झडत होते. भाऊसाहेब सुनीताच्या चारित्र्यावर सतत संशय घ्यायचा. यातूनच त्यांच्यात वाद व्हायचे. शुक्रवारी (ता.१) दुपारी त्यांच्यात वाद झाले. त्यातूनच भाऊसाहेबने पत्नी सुनीता हिचा गळा दाबून खून केला.

सुनीताच्या खुनाचा कोणाला संशय येऊ नये यासाठी पती भाऊसाहेबने तिच्या तोंडात विषारी औषध ओतत तिच्या आत्महत्येचा बनाव केला.

यानंतर भाऊसाहेबने गळफास घेत स्वतः आत्महत्या केली. या घटनेबाबत पोलिसपाटील सोनाली सोनवणे यांनी माहिती दिल्याने चांदवड पोलिसांत अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली होती.

या घटनेसंदर्भात पोलिसांनी मृताच्या घरच्यांची, नातेवाइकांची कसून चौकशी केली. यात भाऊसाहेब हा पत्नी सुनीता हिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याची माहिती लताबाई ठाकरे (५०, उमराणे शिवार, परसूल) यांनी पोलिसांना दिली. लताबाई ठाकरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भाऊसाहेब बरकलेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : नगरविकास खाते पैसे खाण्याचे कुरण, संजय राऊत यांचा मोठा आरोप

Explained: धावताना छातीत का दुखते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' 5 कारण

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT