woman affraid 1.jpg 
नाशिक

धक्कादायक! मंदिराच्या रांगेत मागे उभ्या पुरुषावरून संशय...पतीने केले "असे" कृत्य

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : 26 जुलै 2018 ला पत्नी पंचवटी येथील मंदिरात दर्शनासाठी गेली होती. देवदर्शनासाठी रांगेत उभी असताना तिच्या मागे अन्य स्त्री-पुरुष भाविक उभे होते. नितीन तिचा माग काढत त्याठिकाणी आला. दोघे जण बरोबर घरी गेले. त्यानंतर... 

असा घडला प्रकार...

नितीन वेल्हाळ पत्नीच्या चारित्रावर नेहमी संशय घेत. 26 जुलै 2018 ला पत्नी पंचवटी येथील मंदिरात दर्शनासाठी गेली होती. देवदर्शनासाठी रांगेत उभी असताना तिच्या मागे अन्य स्त्री-पुरुष भाविक उभे होते. नितीन तिचा माग काढत त्याठिकाणी आला. दोघे जण बरोबर घरी गेले. त्यानंतर रांगेत तिच्या मागे असलेल्या पुरुषाशी तिचा काय संबंध आहे, अशी कुरापत काढून पत्नीशी वाद घातला. तिच्या चारित्रावर संशय घेत तिला शिवीगाळ करून मारहाण केली. घरातील किचनचा दरवाजा बंद करून तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. भांडणाचा आवाज आल्याने पीडितेच्या सासऱ्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुसऱ्या मुलास बोलावून दरवाजा तोडला. जखमी पत्नीस जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

पतीला एक वर्षाचा कारावास

भद्रकाली पोलिसांनी पीडितेचा जबाब घेत पती नितीन वेल्हाळ यास अटक करून त्याच्याविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. घटनास्थळावरून, तसेच प्रत्यक्षदर्शींचा जबाब, परिस्थितीजन्य पुरावे आणि पीडितेचा जबाब यावरून तपास पूर्ण करत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. शुक्रवारी (ता. 10) या प्रकरणावर जिल्हा व सत्र न्यायाधीश विकास कुलकर्णी यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. आरोपी नितीन वेल्हाळ याच्यावर आरोप निश्‍चित झाल्याने त्यास एक वर्षाचा सक्षम कारावास आणि 500 रुपयांचा दंड शिक्षा सुनावण्यात आली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Asian Games 2026: अरे आवाजsss कुणाचा... भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले नववे सुवर्णपदक; रोमहर्षक लढतीत इराणवर विजय

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT