panchvati police
panchvati police esakal
नाशिक

पत्नीचा खून करून फरार पती 11 वर्षानंतर ताब्यात

विनोद बेदरकर

नाशिक : 11 वर्षापूर्वी झालेल्या खूनाचा (murder mystery solve) गुन्हा उघडकीस आणण्यास पंचवटी पोलिसांना (panchavati police) यश आले आहे. 11 ऑगस्ट 2010 मध्ये चारित्र्याच्या संशयावरुन त्याने पत्नीचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. (husband murdered wife)

पत्नीच्या चारित्र्यावर संशय

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी चौकशी केली असता, त्यात, संशयिताने ११ वर्षापूर्वी पत्नीच्या चारित्र्यावर संशयावरुन लोखंडी फावडयाने खुन केला असल्याचे सांगितले व तेव्हापासुन कुणाच्याही संपर्कात न येता मिळेल तेथे 15 ते 20 दिवस दुसऱ्यांच्या शेतात मजूरी करून उपजिवीका करत असल्याचे सांगितले. मंगळवारी अटक केल्यानंतर त्याला न्यायालयापुढे हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सहा.पोलीस निरीक्षक सत्यवान पवार हे तपास करीत आहेत.

संशयिताबाबत पोलिस अनभिज्ञ

काशीनाथ बाळू पवार असे संशयिताचे नाव आहे. आडगाव शिवारात ११ वर्षापूर्वी सैय्यद पिंप्री रस्त्यावर घडलेल्या या खूनाच्या प्रकरणात संशयिताबाबत पोलिस अनभिज्ञ होते. या गुन्‍ह्याच्या तपास करतांना गुन्हे शोध पथकाने संशयिताच्या मूळ गाव असलेल्या चिंचओहाळ (ता. त्र्यंबकेश्वर) येथून तपास सुरु केला. गुन्हे शोध पथकाचे उत्तम खरपडे यांनी गावात दोन दिवस मुक्काम करीत, माहीती घेतली असता तेथे अनेक वर्षापासून तो गावाकडे फिरकला नसल्याची माहीती पुढे आली. त्यात काहीनी संशयित मृत झाली असावा अशी शक्यता पुढे आली. मात्र याच दरम्यान एकाने संशयित दिंडोरीत एका शेतावर मजूरी करीत असल्याची माहीती पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्याचा फोटोही नसल्याने पोलिसांनी खून झालेल्या सैयद प्रिंपी रोडवर जाउन खून झालेल्या घटनास्थळापासून सुरुवात केली.

संशयित ताब्यात

सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यावान पवार ,पोलीस नाईक विलास चारोस्कर, नितीन जगताप, कुणाल पचलोरे, उत्तम खरपडे यांनी दिंडोरी परिसरातील वेगवेगळ्या भागातील मळयांमध्ये मागील दोन आठवडया पासुन तळ ठोकून शेतकरी शेतमजूरांकडे चौकशी करीत, संशयित काशीनाथ बाळू पवार याचा माग काढीत बनकर मळा, डंबाळवाडी ता.जि.नाशिक येथुन ताब्यात घेवुन पोलीस ठाण्यास आणले. पोलीस आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त सिताराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, विलास चारोस्कर, पोलीस नाईक नितीन जगताप,कुणाल पचलोरे, उत्तम खरपडे, नारायण गवळी आदीनी ही कामगिरी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT