Fake Currency news esakal
नाशिक

Fake Currency Crime : इडलीवाल्याकडे 5 लाखांच्या बनावट नोटा; एकास अटक

कुणाल संत

नाशिक : इडली विकणाऱ्या एका छोट्‌या व्यवसायिकांकडून पाच लाख आठ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तमिळनाडू येथील रहिवासी असलेल्या संशयित मलायारसन मदसमय ( वय ३३, मूळ रा. ३९,ईस्टमार्ग कायथर, पण्णीकार,कुलूम, तुदूकुडी,तामिळनाडू ) यास पोलीसांनी भारतनगर येथून अटक केली आहे. (idliwala has fake notes of Rs 5 lakhs one Arrested Nashik Latest Crime News)

कालिका यात्रोत्सवात गर्दीचा फायदा घेत बनावट नोटा चलनात आल्या होत्या. ही बाब मुंबई नाका पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांनी याप्रकरणी वेगाने तपास करत केला. यात त्यांना मलायारसन मदसमय यांच्याकडे बनावट नोटा असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी सापळा रचत भारतनगर भागातून संशयित यास अटक केली. त्यानंतर त्याच्याकडून पोलीसांनी तब्ब्ल पाच लाख ८ हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा मिळून आल्या. यामध्ये त्याच्याकडे ५०० रुपये किमतीच्या ४० बनावट नोटा व दोन हजार रुपये किमतीच्या २४४ बनावट नोटा आहेत. या शिवाय त्याच्याकडून ३ हजार ३०० रुपये रोख रक्कम देखील मिळून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Satam : मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड झालेले अमित साटम कोण? वाचा राजकीय कारकीर्द...

Gold-Silver Rate: शेअर बाजारात जोरदार वाढ; तर सोन्या-चांदीचे भाव घसरले, जाणून घ्या आजचा भाव

Vi Recharge : फक्त 1 रुपयांत जिंका 4999 वाला रिचार्ज; 'या' बड्या कंपनीची जबरदस्त ऑफर, यूजर्सचा फायदाच फायदा

Chhagan Bhujbal : मराठा समाज ओबीसीत येऊ शकत नाही; छगन भुजबळांचा स्पष्ट इशारा

Kolhapur Dahihandi: ‘नृसिंह गोविंदा’ तीन लाखांचे मानकरी; सात मनोरे रचून फोडली धनंजय महाडिक युवा शक्तीची दहीहंडी

SCROLL FOR NEXT