adhikari.jpg 
नाशिक

अधिकारी व्हायचयं ना..! मग ही बातमी तुमच्यासाठी..

सकाळवृत्तसेवा

नाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत यापूर्वी जाहिराती प्रसिद्ध केलेल्या असताना कोरोनामुळे उद्‍भवलेल्या परिस्थितीत अर्जप्रक्रिया मंदावली होती. परंतु आता आयोगामार्फत या विविध पदांच्या ९४ जागांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात केली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांना येत्या ३० जुलैपर्यंत ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरण्याची संधी उपलब्ध असणार आहे. 

इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज भरता येणार

काही दिवसांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दोन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यामध्ये केंद्रीय सुरक्षा मंत्रालयासह अन्य विविध केंद्रीय स्तरावरील विभागांमध्ये रिक्‍त असलेल्या पदांचा तपशील जारी करण्यात आला होता. या दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये नियोजित असलेल्या परीक्षा रद्द ठरविल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर या परीक्षांकरिता अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील मंदावली होती. जनजवीन सुरळीत होत असताना आता या जाहिरातीत नमूद केलेल्या पदांकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया शनिवार (ता. ११)पासून सुरू झालेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ३० जुलैपर्यंत अर्ज भरता येणार आहे. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे यापूर्वीच्या अटी व शर्ती उमेदवारांना लागू राहतील. 

...असे आहेत विविध पद 
उपलब्ध नव्वदहून अधिक रिक्‍त जागांपैकी सर्वाधिक जागा या सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर) या पदासाठीच्या आहेत. याशिवाय नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट येथे चीफ डिझाइन इंजिनिअरपदाची एक जागा, आकॅलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया येथील डेप्युटी सुप्रिटंडिंग ॲरकॉलॉजिकल केमिस्टच्या दोन जागा, सुरक्षा मंत्रालयात सहाय्यक अभियंतापदाच्या जागा उपलब्ध आहेत. याशिवाय नॅशनल झुऑलॉजिकल पार्क येथेही असिस्टंट व्हॅअर्निटी ऑफिसर, ईएसआयसी येथे सहाय्यक संचालकपदाच्या तेरा जागा आहेत. अन्य विविध केंद्रीय स्तरावरील विभागांतील रिक्‍त जागांचा यात समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत उलटली, २३ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Pune News: गॅस पाइपलाइनसाठी केंद्राची नवी नियमावली; परवानगी प्रक्रियेतील अडथळे दूर, घरगुती पीएनजी वापराला मिळणार गती

Pune News: हवेलीतील ४६ अधिकारी दोषी! पुण्यातील जमीन मोजणी गैरव्यवहार प्रकरण, कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबविण्यात येणार..

IPL 2026 Marathi News: हर्षित राणाच्या जागी KKR च्या ताफ्यात भारताचा स्पीडस्टार... गुजरात टायटन्सनेही खेळाडू बदलला

SCROLL FOR NEXT