Dilapidated condition of various houses and toilets in police colony.
Dilapidated condition of various houses and toilets in police colony. esakal
नाशिक

Nashik News : इगतपुरी पोलिस वसाहतीची दुरवस्था! अनेकदा अर्ज करूनही बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : दिवस-रात्र नागरिकांसाठी राबणाऱ्या पोलिसांना मात्र राहण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी शासनाने बांधून दिलेल्या पोलिस वसाहतीची दैना झाली असून, आदिवासी तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या इगतपुरी पोलिस ठाण्याच्या जवळच असलेल्या या घरांची अवस्था पाहून नागरिकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसदादा राहतातच कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे. (Igatpuri Police Colony in poor condition Neglect of construction department despite many applications Nashik News)

या वसाहतींची अवस्था अतिशय बिकट व धोकादायक आहे. यामुळे वसाहतच सुविधाअभावी रिकाम्या पडल्या आहेत. ब्रिटिश काळपासून असणाऱ्याया वसाहतीत अद्यापही सुसज्ज व नवीन खोल्या नाहीत. यामुळे या वसाहती सध्यातरी उंदीर व घुशीचा अड्डा बनला आहे. उंदीर, घुशीमुळे ही वसाहत पूर्णपणे पोखरून निघाली आहे.

शौचालयाला अनेक दिवसांपासून दरवाजेच नाही. काही घरांना खिडक्या नाहीत, तर जुने असणारे कौलारू घराचे कौलही तुटली आहेत. यामुळे ही वसाहत शेवटची घटका मोजत आहे. पावसाळ्यात पोलिसांना परिवारासोबत राहण्यासाठी चक्क या घरांवर मोठ्या प्रमाणात ताडपत्री टाकून कसेबसे चार महिने काढावे लागतात.सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा अर्जफाटे करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही.

पन्नास वर्षात सार्वजनिक बांधकाम किंवा लोकप्रतिनिधी चांगली इमारत किंवा दुरुस्ती करू शकलेली नाही, याची खंत नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. पोलिसांच्याच वसाहतीला जर घरघर लागली असेल, त्यांचे प्रश्न कसे मिटविण्यासाठी लोकप्रतिनिधी का दुर्लक्ष करत आहे. केवळ रस्त्यांचे उदघाटन करुन गाजावाजा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना ही समस्या का सोडविली जात नाही, असा प्रश्न पडला आहे.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

इगतपुरी येथील खालची पेठ पारिसरत पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर पोलिस कर्मचाऱ्यासाठी ४० ते ४५ घरे आहेत. मात्र त्याची दुरवस्था झाली आहे. घरांना खिडक्या नाही, पत्रे नाही, दरवाजे तुटले आहेत, अनेक घरांना तर पुढे कुलूप आहे. मात्र चौकटीला दरवाजाच नाही, अशी अवस्था आहे.

शौचालयांची साफसफाई नाही

काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन शौचालय बांधले होते. आता त्याला दरवाजेच नाही, पाणी येत नाही. साफसफाई नाही. काही शौचालयाची ड्रेनेज फुटलेले आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचाही तुटवडा होतो.

"सगळीकडे गवताचे साम्राज्य, ओल्या आणि तडे गेलेल्या भिंती, गळणारे छत, रात्री-अपरात्री निघणारे साप, अक्षरशःप्लास्टिक कागद टाकून छत झाकले आहे, तेही जुने झाले आहे. खिडक्यांना तडे गेलेले, तुंबलेल्या गटारी, खोल्यांमध्ये झोपणे तर दूरच; परंतु बसायलाही जागा नाही. त्यामुळे आपली मुलंबाळं घेऊन वसाहतीत राहणे जिकिरीचे झाले आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देईल का?" - एक पोलिस कर्मचारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT