Igatpuri 
नाशिक

PHOTO : इगतपुरीत अवतरली ‘इंद्रपुरी’; तालुक्यात सर्वदूर मनमोहक चित्र

पोपट गवांदे

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : ‘हिरवे, हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमलीचे, या मखमलीवरती फुलराणीही खेळत होती’ या कवितेला समर्पक असे वातावरण इगतपुरी तालुक्यात सध्या पाहावयास मिळत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यात अखंड कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, दाट धुके व वेगाने वाहणारे वारे, पावसामुळे संपूर्ण तालुक्यात हिरवागार गालिचा, हिरवाईने नटलेले डोंगर, पावसाच्या ढगांच्या दुलईत शिरलेली शिखरे व कडेकपारीतून वाहत येणाऱ्या निर्झरांचे उंचावरून पडणारे धबधबे, असे मनमोहक चित्र सध्या दिसत असल्याने इगतपुरी ही इंद्रपुरी तर नाही ना, असा भास निर्माण होत आहे. (Igatpuri taluka is full of natural beauty during monsoons)

Igatpuri

मात्र, कोरोनामुळे तालुक्यातील सर्वच पर्यटनस्थळांना जाण्यास प्रशासनाने बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. शनिवार व रविवार शासकीय, निमशासकीय कर्मचारी व कामगारांना सुटी असते. या दिवशी हजारो पर्यटक येथे आनंद घेण्यासाठी येतात. मात्र, दोन्ही दिवस वीकेंड असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त असतो. यावरही काही पर्यटकांनी आयडिया केली असून, खेड्याच्या रस्त्याने जाऊन भावली धरण परिसरातील धबधब्याजवळ जाऊन भिजण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी शहरातील नगर परिषद तलाव, भावली धरण, वैतरणा धरण, त्रिंगलवाडी किल्ला, कसारा घाटासह घाटनदेवी या भागात निसर्गाची अनुभूती अनुभवण्यास निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवून भारावून जात आहे. सह्याद्रीच्या कुशीतील थळघाट चढून वर आले, की थंड वाऱ्याची चाहूल लागते. घाट चढून आलेले ढगही इथे क्षणभर विश्रांती घेतात व तालुक्यात आल्यावर या ढगांचे दाट धुक्क्यात रूपांतर होते. पाहता, पाहता हाताच्या अंतरावरचा माणूसही दिसेनासा होतो.

वाहणारे धबधबे स्वर्गाची अनुभूती

इगतपुरीजवळील पिंप्री फाट्यावरून पिंप्री ते भंडारदरावाडी या राज्यमार्गावर भावली धरण लागते. महामार्गावरील पिंप्री-फाट्यापासून अगदी पाच किलोमीटर अंतरावर भावली धरण आणि खळखळ वाहणारे धबधबे म्हणजे स्वर्गाची अनुभूती आहे. याच रस्त्यावर पुढे कुरुंगवाडी लागते. येथील सौंदर्य शब्दातही न सांगण्यासारखे आहे.

Igatpuri

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

Savarkar Controversy : राहुल गांधींच्या भाषणाचा व्हीडिओ युट्यूबवरून हटवू नये, सावरकरांचे नातू न्यायालयात

Pune Fire News : पुण्यात शॉर्टसर्किटमुळे बंगल्यात आग, आठ जणांची सुखरूप सुटका

IND vs PAK सामना आशिया कपमध्ये होऊ नये! पुण्यातील समाजवेवकाची सर्वोच्च न्यायालयात धाव

Latest Marathi News Updates Live: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयाने जामीन नाकारला

SCROLL FOR NEXT