Woman giving statement to police on Sunday. esakal
नाशिक

Nashik News : नैताळे यात्रौत्सवात अवैध मद्य विक्री जोरात; संतप्त महिलांचा पोलिस चौकीवर मोर्चा

अवैध मद्य विक्री तत्काळ बंद करावी व विक्रेत्याकडून होणारी दमबाजीविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील श्री मतोबा महाराजांच्या यात्रोत्सवात विनापरवाना मद्य विक्री होत असल्याने रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील संतप्त महिलांनी रविवारी (ता. २८) सकाळी दहाला नैताळे पोलिस चौकीवर मोर्चा नेऊन पोलिसाना निवेदन दिले.

अवैध मद्य विक्री तत्काळ बंद करावी व विक्रेत्याकडून होणारी दमबाजीविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. ()

श्री मतोबा महाराजांचा यात्रोत्सव १५ दिवस सुरू राहणार आहे. यात्रोत्सवाच्या पश्चिमेकडील आदिवासी बेघर, झोपडपट्टी परिसरात मद्य विक्री जोरात सुरू असल्याने रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शेवटी संतप्त महिलांनी नैताळे पोलिस चौकीवर मोर्चा नेला व मद्य विक्रीच्या त्रासाची कैफियत मांडली.

दरम्यान, ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला आहे. तरीही मद्य विक्री होत असल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले. शिवाय मद्य विक्री करणारे दमबाजी करीत असल्याचे महिलांनी सांगितले. येथील विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या व्यक्तीवर का कारवाई होत नाही, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

निवेदनावर दिव्या सुराशे, अश्विनी माळी, पूजा सुराशे, रेखा सुराशे, पूजा सुराशे, अश्विनी माळी, दिव्या महेश सुराशे, ज्योती पगारे, पूजा देविदास सुराशे, सुवर्णा सुराशे, भारती सुराशे, जयश्री सुराशे, सुनीता गांगुर्डे, मीरा पवार, वर्षा पवार, शाहून रफिक शेख, सीता माळी, मनीषा पवार, संध्या कुसाळकर, अनिता सुराशे आदींसह अनेक महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

''निफाड पोलिसांना महिलांचे निवेदन मिळाले असून, त्याबाबत चौकशी केली जात आहे. दोषींवर कारवाई केली जाईल.''-नंदकुमार कदम, पोलिस निरीक्षक, निफाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : महायुतीच्या नेत्यांची आज गोव्यात बैठक; गोकुळ अध्यक्ष निवडीबाबत होणार चर्चा, सतेज पाटलांनी मुश्रीफ, कोरे, नरकेंकडे काय केली विनंती?

पुणे पदवीधरमध्ये हर्षदा देशमुख आघाडीवर, तर शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदारांना धक्का; कुणाला किती मतं?

Hardik Pandya Trade Speculation: नाद नाय करायचा.. हार्दिकसाठी एक नव्हे सहा फ्रँचायझी मैदानावर! शिवम, रिंकू, यशस्वी, इशान यांना ट्रेड करायला तयार... मोठ्या हालचाली

Marathi News Live Updates : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हर्षदा जाधव यांचा विजय, सोलापुरात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा गुलालाची उधळण करत जल्लोष

Pune Teachers Constituency : अभिजीत बिचुकले यांना मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा पराभव; फक्त १९ मते मिळाली

SCROLL FOR NEXT