Officers of Rural Police and Excise Department taking action with containers illegally transporting Gutkha on Trimbakeshwar-Amboli road.  esakal
नाशिक

Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर- आंबोली रस्त्यावर 87 लाखांचा अवैध गुटखा जप्त

ज्ञानेश्वर गुळवे

Nashik Crime News : आंबोली रस्त्यावर गुटख्याची अवैध वाहतूक करणारा कंटेनर ग्रामीण पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडला आहे यात सुमारे सत्त्याऐंशी लाखांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.

नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनानुसार गुटखाविरोधी अभियान जिल्ह्यात सुरू आहे. त्यातून ही कारवाई करण्यात आली आहे. (Illegal tobacco worth 87 lakh seized in Trimbakeshwar Amboli road nashik crime news)

नाशिक ग्रामीण पोलिसांनी सहा जून पासून जिल्हाभरात गुटखा विरोधी अभियान सुरु केले आहे. सदरच्या कारवाई दरम्यान पान टपऱ्या, गोडावून,दुकाने व इतर अस्थापणांची कसून तपासणी सुरु आहे. याच दरम्यान गुरुवारी २२ रोजी गुटख्याच्या आणखी एक कंटेनर ग्रामीण पोलिसांनी पकडला आहे.

त्यातून सुमारे सत्त्याऐंशी लाख रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. गुटख्याने भरलेला कंटेनर दिल्ली येथून मुंबई-आग्रा रोडने त्र्यंबकेश्वर,जव्हार, मोखाडामार्गे भिवंडी येथे जात होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रवासादरम्यान त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आंबोली टी पॉईंट येथे ग्रामीण पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कंटेनर पकडला आहे.

त्यात रुपये ८७,३८,१००/- लाखांचा एस एच के नावाचा गुटखा मिळून आला आहे. कलम ३२८,१८८,२७२,२७३भादवि नुसार पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रामकृष्ण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस यंत्रणा तपास करत आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर त्र्यंबकेश्वर सह नाशिक जिल्ह्यात स्वागत करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: शहरात उपचार सोपे, गावात सुविधा वाढणार... मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोककेंद्रित महत्त्वाचे निर्णय!

Pune Traffic: चांदणी चौकात महामार्ग ओलांडताना जीवघेणी कसरत; प्रवाशांची गैरसोय : पादचारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : भात पिकाच्या नुकसानीसाठी भरपाईची मागणी; मुळशी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

IPL 2026 Update: काव्या मारनचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, असं करण्याची खरच गरज आहे का? सनरायझर्स हैदराबाद...

जगात कुठं असं होतं का? प्रकल्प रखडल्यानं फडणवीस कंत्राटदारांवर संतापले, म्हणाले, १५ दिवसात पूर्ण करा

SCROLL FOR NEXT