Remdesivir.jpg
Remdesivir.jpg 
नाशिक

कोविड कक्षातील शासकीय कोट्यातील ''रेमडेसिव्हिर'' इंजेक्शनची परस्पर विक्री; दोघांवर गुन्‍हा दाखल 

अरुण मलाणी

नाशिक : गंभीर प्रकृती असलेल्‍या कोरोनाबाधितांना उपचाराचा भाग म्‍हणून रेमडेसिव्हिर इंजेक्शन द्यावे लागते. हे इंजेक्शन परस्पर रुग्णालयाबाहेरील रुग्णाच्या नातलगांना विक्री केल्याचा धक्‍कादायक प्रकार निदर्शनास आला होता.

कंत्राटी कर्मचाऱ्यासह साथीदाराविरोधात गुन्‍हा दाखल

जिल्हा शासकीय रुग्णालयात असलेल्‍या कोविड कक्षातील शासकीय कोट्यामधील रेमडेसिव्हिर इंजेक्शन लंपास करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यासह त्‍याच्‍या साथीदाराविरोधात गुन्‍हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कंत्राटी कर्मचाऱ्याला अटकदेखील केली आहे. अटक केलेल्‍या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव दीपक गणेश सातपुते असून, त्‍याचा मित्र कार्तिक किशोर सोनार (रा. ता. राहता, जि. नगर) याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

इंजेक्शन परस्पर रुग्णाच्या नातलगांना विक्री
रुग्ण संख्येसोबत इंजेक्‍शनला मागणी वाढल्‍याने इंजेक्शनचा काही काळासाठी तुटवडा निर्माण झाला होता. जिल्‍हा रुग्णालयातील कोविड कक्षात कंत्राटी स्‍वरूपात कार्यरत सातपूतेने शासकीय कोट्यातील इंजेक्शनचा अपहार केल्‍यानंतर, इंजेक्शन परस्पर रुग्णालयाबाहेरील रुग्णाच्या नातलगांना विक्री केल्याचा धक्‍कादायक प्रकार निदर्शनास आला होता. या प्रकरणातील सखोल चौकशीनंतर दीपकसह त्याचा मित्र कार्तिकविरोधात औषध निर्माण अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणी तपास पोलिसांकडून सुरू असून, आणखी कोण या प्रकारात सहभागी आहे, याचा शोध घेतला जात आहे.  

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT