Dada Bhuse
Dada Bhuse esakal
नाशिक

Nashik News : पालकमंत्री भुसे यांच्या बैठकीत आमदारांचा तक्रारींचा पाऊस, जलजीवनच्या कामांची होणार पडताळणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन मिशनअतंर्गत सुरू असलेल्या कामावरून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह माजी मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,

आमदार हिरामण खोसकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे वाभाडे काढल्यानंतर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तातडीने कामांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पथक नियुक्त केले आहे. (Immediate decision of ZP Chief Executive Officer to verify Jal Jeevan mission works nashik news)

जिल्हयात जलजीवन मिशनअंतर्गत १२८४ हून अधिक कामे मंजूर असून ही कामे सुरू आहेत. मात्र, कामांबाबत ग्रामपातळीवरून मोठया तक्रारी येऊ लागल्या आहेत. दिशा समितीच्या बैठकीतही या कामावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पालकमंत्री भुसे यांच्या झालेल्या बैठकीतदेखील या कामांबाबत जिल्ह्यातील आमदारांनी तक्रारींचा पाऊस पाडला.

पाण्याचे स्रोत नसताना ठेकेदारांसाठी योजना राबविल्या जात असल्याचे या वेळी आरोप लोकप्रतिनिधींनी केला. त्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ व आमदार खोसकर यांनी थेट जिल्हा परिषदेत ठिय्या मांडत या कामांचा पंचनामा केला. यावरून प्रभारी कार्यकारी अभियंता यांची चांगलीच हजेरी घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वाढत्या तक्रारींवरून मुख्यकार्यकारी अधिकारी मित्तल यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामांची विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून, मंजूर झालेल्या कामाप्रमाणे काम सुरू आहे की नाही याची पडताळणी करावी.

पाण्याचे स्रोत, पाण्याचे पाइप, पाण्याची टाकी याबाबतही पडताळणी करावी. तक्रारी असलेल्या गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधावा अशा सूचना मित्तल यांनी दिल्या आहेत. पडताळणी करण्याचे आदेश मिळाल्यानंतर ठेकेदारांची धावपळ सुरू आहे.

अनेक ठेकेदारांनी कामे अपूर्ण असताना कामांची बिले काढून घेतलेली आहेत. तर काही कामांच्या ठिकाणी पाण्याचे स्रोतदेखील कार्यान्वित नसताना केवळ पाइप टाकून दिशाभूल केलेली आहे. त्यामुळे पडताळणीतून या कामांचा पर्दाफाश होण्यास मदत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhanparishad Election : शिवसेना ठाकरे गटाकडून परब, अभ्यंकर

NASA : भारतीय अंतराळवीरांना आता ‘नासा’चे धडे; गार्सेटी यांची घोषणा

Loksabha Election 2024 : लोकांनी द्वेषाला धुडकावले; राहुल गांधी यांचे प्रतिपादन

Loksabha Election 2024 : ‘साखरेचा वाडगा’ काँग्रेससाठी कडू! देवरियात ओबीसी मतांवर भाजपची भिस्त

Narendra Modi : मतपेढीसाठी ‘इंडिया’चा मुजरा; मोदींची विरोधकांवर टीका

SCROLL FOR NEXT