satish kulkrni.jpeg 
नाशिक

गणेश विसर्जनापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करा - महापौर

विक्रांत मते

नाशिक : पावसामुळे शहरात जागोजागी खड्डे पडले असून, रस्त्यांच्या गुणवत्तेचे पितळ उघडे पडले आहे. महापौर कार्यालयाकडे तक्रारी आल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. गणपती विसर्जनाच्या आत रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 

महापौर कुलकर्णी यांच्या बांधकाम विभागाला सूचना 

आठ-दहा दिवसांपासून रिपरिप सुरू असल्याने रस्त्यांवर पाणी साचून खडी व डांबर बाजूला पडले आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. यासंदर्भात महापौर कार्यालयाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने महापौर कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आठवडाभरात रस्त्यांवरील खड्डे तातडीने खडी व मुरुम टाकून खड्डे रोडरोलरने बुजविण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. 

सार्वजनिक बांधकाम विभागानेही खड्डे खडी व मुरुमाच्या सहाय्याने बुजवण्याचे काम तातडीने सुरू करणार असल्याचे मान्य केले. बैठकीला सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील, स्थायीचे माजी सभापती संजय बागूल, शहर अभियंता संजय घुगे, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, आर. एस. पाटील आदी उपस्थित होते.

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT