Laborers planting Rabi season tomatoes in the field of Rabindra Ahire, a farmer here. esakal
नाशिक

Tomato Cultivation : टमाटा लागवडीमुळे मल्चिंग पेपरला महत्त्व; कांद्याला फाटा अन् टमाटा लागवड जोमात!

गोविंद अहिरे

नरकोळ (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील दसाने, केरसाणे, मुंगसे, पिंगळवाडे सह बहुतांश गावांमध्ये रब्बी हंगामातील टमाटे लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यंदा कांदा लागवडीने उच्चांक गाठल्याने गतवर्षी प्रमाणे यंदाही कांद्याला भाव मिळेल याची शाश्र्वती नसल्यामुळे शेतकरी आता टमाटा पिकाकडे वळले आहेत.

पारंपरिक लागवडीला फाटा देत सध्या या परिसरात गादीवाफे तयार करून मल्चिंग पेपरवर पॉलिहाऊस किंवा रोपवाटिकामधून मोठ्या प्रमाणात टमाटा रोप आणून लागवड होत आहे. (Importance of Mulching Paper for Tomato Cultivation nashik agriculture news)

या लागवडीसाठी खर्चाचे प्रमाण अधिक असते. तार, सुतळी, बांबू लावून मांडव तयार करण्यात येतो. साधारण एप्रिल महिन्यात टमाटा विक्रीस येतो. विहिरीच्या पाण्याची पातळी टिकून राहील या उद्देशाने बहुतांश शेतकऱ्यांनी एक एकर ते अर्धा एकर कांदा लागवड न करता टमाटा लागवड पसंत केले आहे.

त्यानुसार आता टमाटा लागवड जोमात सुरू आहे. टमाटा लागवडीला शेतकरी पसंती देत आहेत. टमाटा अँगल खोदाई व बांबू लावणेसह सुतळी बांधणीसाठी टेंडर पद्धतीने कामे केली जातात.

फवारणीसाठी ट्रॅक्टरवर फवारणी मशिन बसवून काही तासांत फवारणी केली जाते. विक्रीसाठी शेतातच ट्रक उभ्या असतात. विक्रीसाठी शेतकऱ्यांना बाजारात जाण्याची गरज येत नाही. घाऊक व्यापारी शेतातच माल खरेदी करतात.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

एक एकर टमाटा लागवडीसाठी येणारा खर्च :

मल्चिंग पेपर- ५ बंडल- सात हजार रुपये

इनलाईन नळी बंडल- अडीच, चार हजार रुपये

रासायनिक खते - पाच हजार रुपये

शेणखत दोन ट्रॉली- दहा हजार रुपये

मंजुरी-बंडल पेपर पसरविणे-तीन हजार रुपये

पॉली हाऊस मधून ४००० तयार रोप एकरसाठी १ रुपया २० पैसे प्रमाणे पोच - ४८००

टमाटा जाती : विराग, १०५७, नामधारी, वैशाली

"टमाटा हे दोन्ही हंगामात येणारे पीक आहे. खर्च प्रचंड प्रमाणात येतो. चांगला भाव मिळाल्यास उत्पादकांना दोन पैसे मिळतात. भाव मिळेल या आशेवर लागवड होत आहे. पॉली हाऊसमध्ये तयार रोपे मिळत आहेत. त्यामुळे मेहनत कमी घ्यावी लागते."

- साहेबराव मोरे, टमाटा उत्पादक, केरसाणे, (ता. सटाणा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगानुसार किमान 'इतका' असेल पगार, आकडा आला समोर

IND vs NZ 3rd T20I : भारताने जिंकली सलग नववी ट्वेंटी-२० मालिका! अभिषेक, सूर्यकुमारच्या वादळासमोर न्यूझीलंडचा पालापाचोळा

Accident News: भीषण अपघात! महामार्गावर दोन बसची समोरासमोर टक्कर; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

Indian Video : भारताला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या करारावर मिळालंय? 2046 मध्ये इंग्रज परत येणार? वादग्रस्त व्हिडिओतील वक्तव्य कितपत खरं

Latest Marathi news Update : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT