In property survey conducted by nmc number of property has reached 5 lakhs nashik news esakal
नाशिक

NMC Property Survey : मिळकतींची संख्या 5 लाखांच्या घरात; 41 हजार 295 मिळकती अनधिकृत

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेकडून करण्यात आलेल्या मिळकत सर्वेक्षणामध्ये मिळकतींची संख्या जवळपास पाच लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. यात चार लाख २६ हजार ७३४ मिळकती अधिकृत, तर ४१ हजार २९५ मिळकती अनधिकृत आहे. (In property survey conducted by nmc number of property has reached 5 lakhs nashik news)

तर ३० हजार मोकळे भूखंड, पंधरा हजार मिळकती पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असून मिळकतींची संख्या वाढल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

जीएसटी पाठोपाठ महापालिकेला घरपट्टीच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त होते. २०१६ मध्ये विविध कर विभागाकडून प्रॉपर्टी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या वेळी जवळपास पावणेतीन लाख मिळकतींची नोंद झाली होती. त्या वेळी जवळपास ७५ हजार मिळकती नव्याने शोधण्यात आल्या. नवीन सापडलेल्या मिळकतींवर घरपट्टी लावल्याने उत्पन्नात वाढ झाली.

त्यानंतर बांधकामातील कपाटांवरून वाद निर्माण झाला. सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांना नऊ मीटर रुंदीच्या रस्त्‍यांचा दर्जा देण्यात आल्याने शेकडो इमारतींना पूर्णत्वाचा दाखला मिळून मिळकतींची संख्या वाढली. परंतु मिळकतींची संख्या वाढली तरी उत्पन्नात वाढ नव्हती. केंद्र व राज्य सरकारने स्वउत्पन्नात पंचवीस टक्के वाढ करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्याअनुषंगाने सर्वेक्षणातून नोंद झालेल्या मिळकतींना घरपट्टी लावली जात असून, यातून साधारण दोनशे कोटी रुपयांपर्यंत उत्पन्नाचा आकडा पोचणार आहे. शहरात ३० हजार ६३१ मोकळे भूखंड असून, पंधरा हजार २४२ मिळकती पाडण्यात आल्या. या मिळकतीचे पुनर्वसन केले जाणार आहे.

मिळकती वाढण्याचे कारण

- सेकंड होम म्हणून नाशिकला पसंती.
- घरांच्या किमती वाढण्याच्या भीतीने खरेदी.
- विस्ताराच्या मर्यादेमुळे जुने नाशिक व सिडकोतून स्थलांतर.
- अंबड, पाथर्डी, चुंचाळे, गोविंद नगर, इंदिरा नगर भागात अधिक घरे.
- औद्योगिकरणाला पसंती.
- समृद्धी व ग्रीन फिल्ड महामार्ग.
- नाशिक-पुणे रेल्वे व रस्ते मार्गाचे विस्तारीकरण.

अशा आहेत मिळकती

विभाग मिळकत संख्या

सिडको एक लाख १९ हजार ५७६
पंचवटी एक लाख १९ हजार ५२
पूर्व ९० हजार २०१
नाशिक रोड ८३ हजार ४
सातपूर ६१ हजार ४९
पश्चिम ४२ हजार ६१८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT