पत्नीने पत्नीला जाळून पतीने आत्महत्या केली2.jpg 
नाशिक

धक्कादायक! रागाच्या भरात 'त्याचे' हात देखील थरथरले नाही...बायकोला तर पेटवलंच अन् स्वत:देखील...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (गणूर) पत्नीचे हातपाय बांधून तिला जाळून टाकत पतीने स्वतःलादेखील जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. 12) साळसाने (ता. चांदवड) येथे घडली. पत्नीच्या भावाच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

असा आहे प्रकार

कैलास परशराम वाघ हा पत्नी मनीषा हिच्यासोबत साळसाने येथे राहत होता. दहा महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. मात्र कैलास कायम पत्नी मनीषाला मारहाण करत असे. त्यांच्यात भांडण व्हायचे, असे मनीषाचा भाऊ तुळशीराम खुरासने यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, रविवारी सकाळी अकराला मनीषा जळून मृत झाल्याची माहिती तुळशीराम यांना मिळताच त्यांनी बहिणीचे घर गाठले. या वेळी मनीषा पलंगावर 100 टक्के जळालेल्या अवस्थेत आढळली. शिवाय तिचे हात बांधलेले व तोंडातून जीभ बाहेर आल्याचे स्पष्ट दिसत होते. पती कैलास यानेच तिला जाळून टाकत स्वतःलादेखील पेटवून घेतल्याची फिर्याद खुरासने यांनी पोलिस ठाण्यात दिली. 

दरम्यान, कैलासला जळालेल्या अवस्थेत नाशिक येथे उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच त्याचादेखील मृत्यू झाला. दोघा पती-पत्नीच्या मृतदेहांचे विच्छेदन केल्यानंतर रात्री साडेआठला नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT