deathh.jpg
deathh.jpg 
नाशिक

भय इथले थांबेना! अचानक मृत्युसत्र सुरुच...'हा' त्रास होत असेल तर घ्या काळजी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एका बाजूला कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे शहर- जिल्ह्यात ज्येष्ठांमधील जुने विकार बळावले आहेत. त्यातून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः श्‍वास घेण्यात अडचणी, अचानक छातीत दुखून किंवा बेशुद्ध होऊन मृत्यू होण्याचे प्रकार वाढत आहे. श्‍वास घेण्यात अडचण येत असल्याने रविवारी आणखी एक मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. कालिकानगर वसाहतीतील अशोक काशीनाथ घाडगे (वय ६८) यांच्या छातीत दुखून अचानक श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. 

बेशुद्ध होऊन तिघांचे मृत्यू 
श्‍वास घेण्याशिवाय रविवारी तिघा रुग्णांचा बेशुद्ध होऊन काही वेळातच मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. सिडकोत रायगड चौकातील सावतानगर भागात अविनाश शंकर महाले (वय ५५) राहत्या घरी बेशुद्ध स्थितीत आढळल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत सातपूरला सुहास एकनाथ जोशी (वय ६५) यांना त्रास होऊ लागल्यने काही वेळात बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल केले असता त्यांचाही मृत्यू झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

SCROLL FOR NEXT