Mahant Ramnarayandasji Maharaj, BJP city president Girish Palve, former House leader Dinkar Patil etc. while giving the statement of demand to the district collector.
Mahant Ramnarayandasji Maharaj, BJP city president Girish Palve, former House leader Dinkar Patil etc. while giving the statement of demand to the district collector. esakal
नाशिक

Nashik News: कपिलधारा तीर्थाचा सिंहस्थ आराखड्यात समावेश करा; जिल्हाधिकाऱ्यांकडे BJP शिष्टमंडळाची मागणी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन प्रशासन पातळीवर सुरू झाले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचा विकास आराखडा तयार करताना श्री कपिलधारा तीर्थाचादेखील समावेश करावा, अशी मागणी महंत श्री रामनारायण दासची महाराज (फलाहारी बाबा) यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकायांकडे केली. (Include Kapildhara Tirtha in Simhastha scheme BJP delegation demands to District Collector Nashik News)

त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा सोहळा पार पडतो. पुरातन काळापासून त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा काळात शाही स्नानाचे आयोजन होते. कुंभमेळ्यासाठी देश- विदेशातून भाविक येतात.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील श्री कपिलधारा तीर्थ हेदेखील सिंहस्थाचे मुळ स्थान आहे. सदर तीर्थास पुरातन काळापासून अनेक संतांनी तसेच चीनचा महाप्रवासी व्हूयेन सांग यांनीदेखील कपिलधारा तीर्थास भेट दिली आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारकडून आवश्यक असलेल्या कामांचा कृती आराखडा तयार केला जातो. कृती आराखड्यात त्र्यंबकेश्वर व नाशिक येथील कामांचा समावेश होतो. श्री कपिलधारा तीर्थ हे पण सिंहस्थाचे मुळ स्थान असल्याने २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कृती आरखड्यात येथील कामांचा प्राधान्याने विचार करून समावेश करण्यात यावा.

श्री कपिलधारा तीर्था जवळच श्रीराम मंदिर शुक्ल तीर्थ असल्याने येथे भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणच्या कामाचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी सभागृहनेते दिनकर पाटील आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT