Income Tax Department raids jewelers shops in Pimpri-Chinchwad Pune marathi news esakal
नाशिक

IT Raid Nashik : नाशिक-सिन्नर रस्त्यावरील टोलनाक्यावर आयकर विभागाची धाड

सकाळ वृत्तसेवा

IT Raid Nashik : नाशिक-सिन्नर रस्त्यावर शिंदे येथे असलेल्या टोलनाक्यावर मुंबई आयकर विभागाने धाड टाकली. या ठिकाणी असणाऱ्या स्वीकारतेप्रमुख प्रशासनातील व्यक्तींचे मोबाईल जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. (Income tax department raid on toll booth nashik news)

ही तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, लोक भरणारा टोलचा ताळमेळ लागत नाही म्हणून या कंपनीवर छापेमारी केल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय चेतक कंपनीचे दहा ठिकाणी टोलनाके आहेत. एकाच वेळी या सर्व टोलनाक्यांवर धाडसत्र सुरू आहे.

चेतक एंटरप्राइजेस काँग्रेसच्या एका आमदाराची कंपनी आहे. राजस्थानचे आमदार अनिल जैन यांचा हा टोलनाका असल्याचे समजते.

आयकर विभागाने किती रक्कम हस्तगत केली, या संदर्भात माहिती मिळाली नाही.

दरम्यान, ही धाड टाकताना आयकर विभागाने गुप्तता पाळली होता. या टोलनाक्याच्या प्रशासनात अनेक राजकीय नेत्यांचे हितसंबंध जोडलेले असल्यामुळे या कारवाईकडे संबंध नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT