नाशिक : खडकाळी सिग्नल परिसरातील अर्धवट कामामुळे हवेत उडणारे धूलिकण
नाशिक : खडकाळी सिग्नल परिसरातील अर्धवट कामामुळे हवेत उडणारे धूलिकण esakal
नाशिक

स्मार्ट सिटीच्या कामाने नेत्र विकारांमध्ये वाढ

- युनूस शेख

जुने नाशिक : शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांच्या कामांमुळे नेत्रविकारांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय अपघाताच्या घटनाही घडत आहे. नियोजन पूर्वकामे करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्मार्टसिटी अंतर्गत शहराच्या अनेक भागांत स्मार्ट रस्त्याचे काम सुरू आहे. उच्च दाबाच्या वीजतारा भूमिगत करण्यापासून ते नवीन ड्रेनेज पाइपलाइन भूमिगत करून स्मार्ट रस्ता तयार केला जात आहे. रस्ता खोदून पाइपलाइन टाकल्यानंतर रस्त्याचे काँक्रिटीकरण होणे आवश्यक आहे. मात्र, तसे केले जात नाही. मातीने खड्डे बुजविले जात आहेत. ग्रामीण भागातील कच्चा रस्त्यांचा प्रत्यय शहरातील रस्त्यांवर येत आहे. अनेक महिने ते रस्ते तसेच राहिल्याने प्रवास करीत असताना, मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे.

धुलिकण हवेत पसरून प्रदूषणात वाढ होत आहे. ते धूलिकण नागरिकांच्या डोळ्यांमध्ये जाऊन नेत्रविकारांना निमंत्रण देत आहेत. डोळ्यातून पाणी येणे, खाज सुटणे, डोळे खुपणे, डोळे लाल होणे, बारीक लिखाण वाचण्यास त्रास होणे, असे नेत्र विकार नागरिकांना जाणवत आहेत.

बऱ्याच वेळेस धूलिकण डोळ्यात गेल्याने डोळे बंद होत असतात. धूलिकणांचे प्रमाण अधिक असल्यास समोरचे वाहन न दिसता अपघात होत आहे. रस्त्यांवरील खड्डे अर्धवट बुजविल्यामुळे रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे वाहने घसरून अपघात होत आहे.

सुमारे ५० टक्के वाहनचालकांना धुळीकणाचा त्रास होऊन नेत्रविकाराच्या समस्या भेडसावत आहे. एखादा खोदलेला रसत्यात पाइपलाइन, वीजतारा टाकून पूर्ण करून त्वरित रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे. त्यानंतरच पुढील रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

वडाळा रोड, त्रंबक सिग्नल ते खडकाळी सिग्नल या रस्त्यांवर धूलिकणांची अधिक समस्या जाणवत आहे. अनेक दिवसांपासून या रस्त्यावरील खोदकाम होऊन पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तरीही रस्त्याचे काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण करण्यात आलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 Playoffs : पांड्याच्या मुंबईने पकडली घरीची गाडी... आता कोणात्या संघाचा लागणार नंबर? जाणून घ्या प्लेऑफचे गणित

Rahul Gandhi : टेम्पो भरुन पैशांच्या आरोपांना राहुल गांधींचं उत्तर; मोदींना उद्देशून म्हणाले, वैयक्तिक अनुभव...

Karnataka SSLC 10th Result Declared: दहावी परीक्षेचा निकाल जाहीर; या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

Hingoli Siddheshwar Dam : हिंगोली, वसमत व पूर्णा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर धरणाने गाठला तळ

Latest Marathi News Live Update : नवनीत राणांवर निवडणूक आयोगाने कारवाई करावी; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

SCROLL FOR NEXT