Summer Onion Auction held at Market Committee on Wednesday. esakal
नाशिक

Nashik Onion News : कांद्याच्या दरात वाढ, शेतकऱ्यांमध्ये समाधान; निर्यात शुल्क वाढीचा परिणाम नाही

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion News : येथील बाजार समितीत बुधवारी (ता. २५) उन्हाळ कांद्याला कमीत कमी २२०० रुपये, जास्तीत जास्त ४,५५१, तर सरासरी ४३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. काही दिवसांपासून कांद्याच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत.

त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लालकांद्याची आवकही सुरू झाली असून, त्याचे प्रमाण अल्प आहे. लाल कांद्याला किमान ३४०० रुपये, तर कमाल ३८००, तर सरासरी ३४०० रुपयांचा दर मिळाला. (Increase in onion prices in lasalgaon nashik news)

दरम्यान, केंद्र शासनाने किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचे जाहीर केले होते. या निर्णयामुळे शासनाविरोधात शेतकऱ्यांची नाराजी वाढली.

सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे केंद्र सरकार वारंवार सांगत आले. मात्र, सरकारने घेतलेला निर्णय किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी फोल ठरला आहे. कांद्याच्या बाजारभावात या निर्णयाचा कुठलाही परिणाम होत नसल्याचे चित्र दिसत आहे.

अफगाणिस्तान, तुर्कस्तान आणि पाकिस्तानात कांद्याची उपलब्धता नसल्याने दुबई, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, बांगलादेशमध्ये भारतातून कांदा निर्यात होत आहे, याचा परिणाम म्हणून उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

उन्हाळी कांद्याचे दर साडेचार हजार रुपयांच्या पुढे पोहोचले आहेत. येत्या काही दिवसांत कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात कांदा उत्पादकांना आणखी दिलासा मिळेल, असे चित्र तयार होत आहेत.

सध्या उन्हाळ कांदा शेतकऱ्यांकडे खूपच कमी प्रमाणात शिल्लक आहे. उन्हाळी कांदा संपतो, त्यावेळी बाजारात नवीन हंगामातील लाल कांदा येतो. सध्या नवीन हंगामातील लाल कांदा बाजारात आला आहे. नवीन कांद्याची आवक खूपच कमी आहे. नवीन लाल कांद्याची आवक महिन्यानंतर वाढण्याची शक्यता आहे.

पुढील एक महिना तरी बाजारात तेजी कायम राहील. देशासह जगाला कांदा पुरविण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समितींमध्ये उन्हाळ कांद्याची आवक निम्याने घटली आहे. यंदा पावसाने पाठ फिरविल्याने नवीन लाल कांदा अजून अल्प प्रमाणात विक्रीस येत आहे. खरीप पिकाची स्थानिक बाजारपेठेत आवक कमी झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यात घाऊक कांद्याचे भाव आठवडाभरात जवळपास ३५ टक्क्यांनी वाढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT