Crime News esakal
नाशिक

Nashik MD Drug Case: एमडी प्रकरणातील काळेच्या पोलीस कोठडीत वाढ; अंमली पदार्थविरोधी पथके परराज्यात ठाण मांडून

सकाळ वृत्तसेवा

Nashik MD Drug Case : सोलापूरच्या मोहोळ येथील एमडी ड्रग्जचा कारखाना उदध्वस्त केल्यानंतर याप्रकरणी अटक करण्यात आलेला मनोहर काळे (रा. नाशिक) याच्या पोलीस कोठडीत येत्या शनिवारीपर्यंत (ता.४) वाढ करण्यात आली आहे.

काळे याच्या नावावर सदरील कारखान्याचा भाडेकरार झालेला असल्याने यात आणखी कोण-कोण सामील आहेत, आर्थिक गुंतवणूक कोणाची आहे याचा पोलीस तपास करीत आहेत. (Increase in police custody of Kale in MD case By deploying anti narcotics squads abroad nashik crime)

गेल्या सप्टेंबर महिन्यात नाशिकरोड पोलिसांनी गणेश शर्मा याला १२.५ग्रॅम एमडी ड्रग्जसह पकडले होेते. या गुन्ह्याचा तपास करणार्या अंमली पदार्थविरोधी पथकाने माेठे रॅकेट शोधून काढताना ललित पाटील पाठोपाठ दुसरा ड्रग्जमाफिया सनी पगारे याला अटक केली.

सनी पगारे याने मनोहर काळे याच्या मदतीने मोहोळ (जि. सोलापूर) येथे एमडी ड्रग्जचा कारखाना थाटला होता.

सनी पगारे, सुमित पगारे, मनोज गांगुर्डे, अर्जून पिवाल, भूषण मोरे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर मोहोळमधील त्यांनी थाटलेला एमडी ड्रग्जचा कारखाना नाशिक पोलिसांनी उदध्‌वस्त केला.

कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्ज, कच्चा माल व रसायने पोलिसांनी जप्त केला आहे. तर या कारखान्याशी करण्यात आलेला भाडेकरार हा मनोहर काळे याने केला होता. त्यामुळे त्यासही पोलिसांनी अटक केली होती.

त्याच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यास बुधवारी (ता.१) हजर केले असता न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत पोलीस कोठडी वाढविली आहे. त्याच्या चौकशीतून अजूनही या गुन्ह्यात आणखी कोणाची भागीदारी आहे, आर्थिक फंडिंग कोणी केली याचा तपास सुरू आहे.

पथके परराज्यात

शहर गुन्हेशाखेच्या युनिट एक व अंमली पदार्थविरोधी पथक शहरातील एमडी ड्रग्जशी संबंधित गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

त्यासाठी काही पथके ही परराज्यात रवाना करण्यात आली असून, ठाण मांडून आहेत. या गुन्ह्याच्या खोलात जाऊन संशयितांना जेरबंद करण्यासाठी पोलिस कसून शाेध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT