sarda circle 1.png 
नाशिक

शाळा सुटल्यावर "ती" घरी जाताना...तोंडाला रुमाल बांधून तिच्यावर त्याची नजर...पुढे..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सारडा सर्कल भागात टवाळखोरांचा वावर वाढला आहे. परिसरातील शाळांच्या बाहेर थांबून मुलींची छेड काढण्याचे प्रकार घडत आहेत. गुरुवारी (ता. 6) असाच एक प्रकार घडला. तेथे काही वेळ तणावाचे वातावरण पसरले होते. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण निवळले. 

सारडा सर्कल भागात अशी घडली घटना....

शाळेतील एक अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यावर घरी परतत असताना तिला एक संशयित त्रास देत होता. दोन ते तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. तोंडाला रुमाल बांधून संशयित येत होता. कुटुंबीयांना तिने घडलेला प्रकार सांगितला. संशयितासारखाच एकजण त्यांच्या मुलीस शाळेत सोडण्यासाठी आला होता. घाबरलेल्या मुलीस संशयित आल्याचा भास झाला. त्यातून गुरुवारी (ता. 7) शाळेच्या बाहेर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मध्यस्थी केली.

यापूर्वीही असे अनेक प्रकार

यापूर्वीही असे अनेक प्रकार भागात घडले आहेत. विविध भागांतील टवाळखोर शाळा, महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत चौकात गर्दी करून धिंगाणा घालण्याचा प्रयत्न करतात. शाळेने सुरक्षेची काळजी घेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. प्रवेशद्वारावर कर्मचारीही नियुक्त केले आहेत. पोलिसांनी शाळा, महाविद्यालय भरणे आणि सुटण्याच्या वेळेत या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, गस्त वाढवावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Election Commission: आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दोन प्रवाह; सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर काथ्याकूट

Maharashtra Drought: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका; कृषिमंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित बैठका रद्द

Latest Marathi News Live Update : युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवलेंसह ३३ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

SCROLL FOR NEXT