radhakrushna game.jpg 
नाशिक

महसूल वाढीसाठी वाळू लिलावांची संख्या वाढवा; विभागीय आयुक्तांच्या सूचना

सकाळवृत्तसेवा

नाशिक : वाळूचा अंदाज घेण्यातील अडचणींवर मात करीत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी उत्तर महाराष्ट्रात ७२८ कोटी महसूल वसुलीचे उद्दिष्ट्ये निश्‍चित केले. श्री. गमे ऑनलाइन आढावा बैठकीत म्हणाले, नाशिक विभागात जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू लिलावांची संख्या वाढवून जमीन व गौण खनिज महसूलवाढीवर भर द्यावा.

पर्यावरण समितीकडे पाठपुरावा

श्री. गमे म्हणाले, कोरोनामुळे महसुलावर परिणाम झाला. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अधिकाऱ्यांनी महसूल वसुलीवर लक्ष द्यावे. उत्तर महाराष्ट्रात ६५ वाळू गट लिलावांपैकी पर्यावरण समितीकडील प्रलंबित ३१ प्रकरणे मार्गी लावावीत. साप्ताहिक आढावा घ्यावा. अनधिकृत दगड खाणी आणि खडी क्रशरला आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त मंजुरी द्यावी. शासकीय जमिनीवर नव्याने दगड खाणीसाठी परवानगीसाठी माहिती संकलनाच्या सूचनाही दिल्या. 

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे (नाशिक), डॉ. राजेंद्र भोसले (नगर), संजय यादव (धुळे), डॉ. राजेंद्र भारुड (नंदुरबार), तर अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन (जळगाव), उपायुक्त अरुण आनंदकर, अर्जुन चिखले, प्रादेशिक उपसंचालक संगीता धायगुडे, सहआयुक्त स्वाती थविल, प्रतिभा संगमनेरे, उपसंचालक भूमिअभिलेख ए. एस. कुलकर्णी, तहसीलदार नरेश बहिरम, महेश चौधरी, योगेश शिंदे उपस्थित होते. 

अतिवृष्टीमुळे नदीत पाणी असल्याने वाळूसाठ्याचा अंदाज घेण्यास अडचणी असल्या तरी, वाळू लिलावाची प्रक्रिया पूर्ण करावी. नाशिक विभागात जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू लिलावांची संख्या वाढवून जमीन व गौण खनिज महसूलवाढीवर भर द्यावा. - राधाकृष्ण गमे (विभागीय आयुक्त)  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

SCROLL FOR NEXT