Increase participation of schools in Swachhata Monitor 2 campaign CM Shinde appeal Nashik News esakal
नाशिक

Nashik News: 'स्वच्छता मॉनिटर- 2' अभियानात शाळांचा सहभाग वाढवा; CM शिंदेंचे आवाहन

' मुख्यमंत्री - माझी शाळा, सुंदर शाळा' स्पर्धात्मक अभियानातून चाकोरीबाहेरील विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळा परस्परांशी स्पर्धा करतील व त्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.

अजित देसाई

सिन्नर : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवण्यावर भर देण्यात येत आहे.

' मुख्यमंत्री - माझी शाळा, सुंदर शाळा' स्पर्धात्मक अभियानातून चाकोरीबाहेरील विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळा परस्परांशी स्पर्धा करतील व त्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.

सार्वजनिक स्वच्छता व त्या माध्यमातून चांगले सामाजिक आरोग्य जोपासता यावे यासाठी ' स्वच्छता मॉनिटर टप्पा - २ ' हे अभियान राज्यात राबवण्यात येणार असून या उपक्रमात शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. (Increase participation of schools in Swachhata Monitor 2 campaign CM Shinde appeal Nashik News)

' मुख्यमंत्री - माझी शाळा, सुंदर शाळा ' अभियानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांसाठी प्रत्येक शाळेत मुख्यमंत्र्यांच्या सहीचे संदेश पत्र वितरित करण्यात येत आहे.

पालक व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती उत्तरदायित्वाच्या भावनेतून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी यथाशक्ती योगदान द्यावे. ' महोत्सव ' , ' माझी शाळा - माझी परसबाग ' यासह 'स्वच्छता मॉनिटर टप्पा २ ' या उपक्रमांमध्ये राज्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदेश पत्राद्वारे केले आहे.

राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये ' एक राज्य - एक गणवेश ' योजना, विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांनाच वह्यांची पाने जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्यासाठी शालेय पोषण आहार सुधारणा केली जात आहे. प्रादेशिक आहाराच्या आवडीनिवडी आणि सवयी विचारात घेऊन ही सुधारणा आहे. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सहभागातून परसबाग विकसित करून त्यातील भाज्या व फळभाज्यांचा समावेश आहारात करण्याची योजना सरकारने आखली आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करून पोषण आहार सुधारणा करण्यासाठी बालरोग तज्ञांच्या संघटनेसोबत करार केला आहे. विद्यार्थिनींच्या शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शासनाकडून सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन देखील लावण्यात येतील.

काही शाळांची स्थिती व शासनाच्या अनुदानाच्या मर्यादा विचारात घेऊन 'दत्तक शाळा योजना ' शाळांमध्ये चांगल्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देईल याकडे मुख्यमंत्र्यांनी संदेश पत्रातून लक्ष वेधले आहे.

शासन अनुदान प्राप्त प्रत्येक शाळांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या या संदेश पत्राचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले आहे.

नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एचसीएल, टीआयएसएस या संस्थांसोबत सरकारने करार केला आहे. पूर्वी आठवीपासून दिले जाणारे व्यावसायिक शिक्षण सहावीपासून देण्यात येईल.

विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार आसपासच्या परिसरातील उच्च शिक्षणाच्या आणि नोकरीच्या कक्षा विचारात घेऊन मनोवैज्ञानिक चाचणींद्वारे विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

सर्व शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी, इंग्लिश लैंग्वेज लॅब, एसटीइएम लॅब, रोबोटिक लॅब इत्यादी उभारणी करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना 21 व्या शतकातील शिक्षणाच्या अद्ययावत संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे संदेश पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले आहे.

"आपले घर, परिसर , गाव स्वच्छ राहावे असे प्रत्येकाला वाटते. तसेच तुमची शाळा सुंदर करण्यासाठी रोज थोडा वेळ द्या. त्यातून आरोग्यदायी आणि सुदृढ समाज घडेल. विद्यार्थी शिक्षक, आणि पालक हा बदल घडवू शकतात. या बदलातूनच प्रगत महाराष्ट्रासाठी तुमचे महत्त्वपूर्ण योगदान मिळेल."- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT