Increase in plastic use despite ban nashik marathi news 
नाशिक

बंदी असूनही प्लॅस्टिक वापरात वाढ; शहर परिसरात कारखान्यांची होणार तपासणी

विक्रांत मते

नाशिक : शहरात प्लॅस्टिक वापरण्यास बंदी असली तरी कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक जमा होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. शहर व परिसरात कारखाने असल्याच्या संशयावरून तपासणी करण्याच्या सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात आल्या आहेत. 

परिसरात प्लॅस्टिकचे कारखाने असल्याचा संशय

२०१८ मध्ये राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने राज्यात प्लॅस्टिक, थर्माकोल या अविघटनशील वस्तूंच्या वापरावर बंदी आणली आहे. प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पथकांची नियुक्ती महापालिकेत करण्यात आली. अडीच वर्षांपासून प्लॅस्टिक वापरावर बंदी आणताना जप्तीची कारवाई केली जात आहे. परंतु खत प्रकल्पावर घंटागाडीच्या माध्यमातून जो कचरा पडतो, त्यात सर्वाधिक प्लॅस्टिकचे प्रमाण अधिक असल्याची बाब लक्षात आल्याने शहरात बंदी असेल तर प्लॅस्टिकचा संचय होतो कोठून, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहराच्या आसपास प्लॅस्टिकचे कारखाने असल्याचा संशय निर्माण झाल्याने या कारखान्यांचा शोध घेण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी घनकचरा विभागाला दिल्या आहेत. 

गुदाम तपासणार 

गेल्या अडीच वर्षांपासून प्लॅस्टिक वापरावर कारवाई करताना एक हजार १४५ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कारवाई केल्यानंतरही प्लॅस्टिक वाढत असल्याने तपासणी मोहीम तीव्र केली जाईल. त्याचबरोबर ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून मागविल्या जाणाऱ्या वस्तूंना प्लॅस्टिकचे वेस्टन असल्याने त्यावरही बंदी आणली जाणार आहे. थेट गुदामामध्ये तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT