nmc2.jpg
nmc2.jpg 
नाशिक

भाजपच्या नगरसेवकांचे दबावतंत्र! चुकीच्या पद्धतीच्या प्रस्तावामुळे अधिकारी थेट रजेवर?

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेत चुकीचे काम होऊ नये, यासाठी नगरसेवकांना भूमिका वठविणे गरजेचे असते. परंतु नाशिक महापालिकेत सध्या उलटे वारे वाहत आहेत. महासभेची मंजुरी न घेता वृक्षगणनेची वाढीव खर्चाची सुमारे सव्वादोन कोटींची देयके ठेकेदाराला मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे काही नगरसेवक सरसावले असून, उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर केला जात आहे. 

चुकीच्या पद्धतीच्या प्रस्तावामुळे अधिकारी रजेवर? 

नगरसेवकांच्या दबंगगिरीला कंटाळून उद्यान विभागाचे काही अधिकारी रजेवर गेल्याने महापालिकेत चर्चेचा विषय ठरत आहे. महापालिकेने २००७ मध्ये शहरातील वृक्षांची गणना करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २.१३ कोटींच्या प्रशासकीय खर्चाला मंजुरी देण्यात आली. मे. टेरिकॉन इकोटेक यांना या कामाचा ठेका देण्यात आला. २० डिसेंबर २०१७ पर्यंत या ठेक्याची मुदत होती. शहरात २५ लाख झाडे असतील, असा महापालिकेचा सुरवातीला अंदाज होता. परंतु वृक्षगणनेचे आश्चर्यकारक आकडे समोर आले. या वृक्षगणनेत शहरात ४९.९५ लाख झाडे असल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आला. विशेष म्हणजे यातील निम्मी झाडे गिरीपुष्प प्रजातीची असल्याचे अहवालात दर्शविले गेल्याने या वृक्षगणनेविषयी नगरसेवकांमध्ये संशय निर्माण झाला होता. 

प्रस्ताव महासभेवर आणण्याचा घाट 

या संशयाच्या वातावरणातच तब्बल पाचव्यांदा वृक्षगणनेच्या जादा खर्चासह ४.१८ कोटींचा कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव ऑनलाइन महासभेत मान्यतेसाठी सादर करण्यात आला. या प्रस्तावाला नगरसेवकांनी महासभेत कडाडून विरोध दर्शविल्यानंतर प्रस्ताव मागे घेण्याच्या सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिल्या होत्या. हा विषय विस्मरणात गेला असताना आता नव्याने सव्वादोन कोटी रुपये अतिरिक्त खर्चाचा प्रस्ताव महासभेवर आणून मंजुरीचा घाट घातला जात आहे. त्यासाठी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांवर भाजपचे काही नगरसेवक दबाव आणत आहेत. चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव ठेवण्याचा अट्टहास केला जात असल्याने भविष्यात कायदेशीर अडचणी निर्माण होऊन कारवाई होण्याच्या भीतीने उद्यान विभागाच्या संबंधित अधिकारी रजेवर गेल्याचे बोलले जात आहे. 

कायदेशीर सल्ल्याचा मार्ग 

धोरणात्मक किंवा खर्चाचा विषय मंजूर करण्यासाठी महासभेची मान्यता आवश्यक असते. वाढीव वृक्षगणना करताना महासभेची मान्यता न घेतल्याने सव्वादोन कोटींच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव बेकायदेशीर ठरत आहे. परंतु वाढीव खर्चाचा प्रस्ताव मंजूर न केल्यास संबंधित कंपनी न्यायालयात जाण्याची भीती दाखविली जात असून, त्यासाठी कायदेशीर सल्ल्याच्या आडून खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा घाट घालण्यात आला आहे. कायदेशीर सल्ल्यात वृक्ष प्राधिकरण समितीवर वाढीव खर्चाचा प्रस्ताव सादर करावा. त्यामार्फत खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे.  


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT