Saptashrungi Devi Idol esakal
नाशिक

Independence Day 2023: आदिमाया सप्तशृंगीच्या दरबारात तिरंगी आरास!

दिगंबर पाटोळे

Independence Day 2023 : स्वयंभू आद्य शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर आज स्वातंत्र्य दिना निमित्त आदिमाया सप्तशृंगी मंदीराच्या गाभाऱ्यात फुलांची तिरंगी मनमोहक आरास करण्यात आली होती.

तिरंगी सजावटीत त्रिगुणात्मक स्वरुपी आदीशक्ती सप्तशृंगी मातेचे रुप अधिकच खुलून गेले होते. (Independence Day 2023 tricolour decoration in Adimaya Saptshringi devi temple nashik)

सह्याद्रीच्या पर्वताच्या पूर्व - पश्चिम पर्वतरांगेत समुद्र सपाटीपासून सुमारे ४६०० उंचीवर असलेल्या सप्तश्रृंगी गड हिरव्यागार भरझरी शालुने नटलेल्या आद्य स्वंयभू शक्तीपीठात सलग आलेल्या सुट्यांची पर्वणी साधत हजारो भाविकांनी तीर्थाटनासाठी गर्दी केली आहे.

गेल्या पंधरा - वीस दिवसांपासून होत असलेला रिमझिम स्वरुपाचा सुरु असलेला पाऊस, डोंगरावर उतरणारे नभ, अधून मधून पसरणारी दाट धुक्याची चादर, डोंगर कपाऱ्यांतून उडणारे पाण्याचे फवारे त्यात आदिमायेच्या जयघोष, पुरोहितांची स्त्रोत्र सुमनांजली अशा भक्तीमय व निसर्गमय वातावरणाच्या मिलापात चिंब झालेले हाजारो भाविक आदिमायेच्या दरबारात नतमस्तक होत आहे.

आज स्वातंत्र्य दिना निमित्त आदिमायेच्या गाभाऱ्यात यजमान भाविकांच्या माध्यमातून सजावटीची सेवा देणारे शंकरराव जुन्नरे यांनी स्वखर्चाने आदिमायेच्या गाभाऱ्यांत फुले व पाने यांची तिरंगी आरास केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यासाठी न्यासाचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, मंदीर प्रमुख प्रशांत निकम, सुनिल कासार व पुरोहित संघ यांचे सहकार्य लाभले.

आदिमायेच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूस साकारलेला तिरंगा व तिरंगी झुंबर त्यात हिरव्यागार निसर्ग सौदर्यांत आदिमायेला नेसवलेला हिरवा शालू, ललाटी तिरंगा कुंकु व सोन्या चांदीच्या दागिन्यांनी नटलेल्या आदिमायेचे तेजस्वी आश्वासक मूर्तीपुढे लीण होत होते.

शनिवार, रविवार, आज मंगळवार स्वातंत्र्य दिन व पारशी नववर्ष असे शासकिय सुट्टी आल्याने चाकरमान्यांनी तीर्थाटन व पर्यटनाचे नियोजन करीत सप्तशृंगी गडाला अग्रक्रम दिल्याचे चित्र गेल्या चार दिवसांपासून सप्तशृंगी गडावरील भाविक व पर्यटकांच्या गर्दीमूळे दिसत आहे. त्यामूळे गडावरील अर्थचक्रालाही गती मिळाल्याने व्यावसायीकांमध्ये समाधान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT