Satyajit Tambe, an independent candidate of the Nashik Graduate Constituency of the Vidhan Parishad during a discussion with graduates at Gar. esakal
नाशिक

Satyajeet Tambe | नाशिक, अहमदनगरमध्ये आयटी-ऑटोमोबाईल हब : अपक्ष सत्यजित तांबे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यास नाशिक व नगर शहरांमध्ये आयटी व ऑटोमोबाईल हबसाठी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी दिले. त्याचप्रमाणे जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून ५०० नवीन उद्योजकांची फळी तयार करणार असल्याचा दावा त्यांनी केला. (independent Satyajeet Tambe IT Automobile Hub in Nashik Ahmednagar nashik news)

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तांबे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. सोमवारी (ता. २३) नगर येथे युवक व पदवीधारकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की नाशिक व नगर ही दोन शहरे नव्याने समृद्धी महामार्गाला जोडली गेली आहे.

नाशिक-पुणे रेल्वेमार्ग, सुरत-चेन्नई ग्रीन फील्ड महामार्ग, याचा विचार करतात भविष्यात वेगाने प्रगती होणारी ही दोन शहरे आहेत. राज्याच्या गोल्डन ट्रँगलमध्ये हे दोन्ही शहरे येत असल्याने भविष्याची गरज लक्षात घेता आयटी व ऑटोमोबाईल हब बनविण्यास आपले प्राधान्य राहील.

यानिमित्ताने उत्तर महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगाराची मोठी संधी निर्माण होईल. नाशिक हे राज्यातील मोठे शहर असून, औद्योगीकरणामुळे येथे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. नगर हे पुण्यापासून जवळ असल्याने हिंजवडी, मगरपट्टा परिसरातील आयटी उद्योग व पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण परिसरातील ऑटोमोबाईल उद्योग नगरजवळ येतात.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

त्यामुळे नाशिक व नगर या दोन्ही शहरांमध्ये आयटी व ऑटोमोबाईल निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहे. यासाठी व्हीजन डॉक्युमेंट तयार करून एमआयडीसीमध्ये या उद्योगांसाठी जागा निर्माण करून देण्याचे आपले प्रयत्न असेल. नाशिकपासून मुंबईचे अंतर जवळ असल्याने स्वयंचलित इलेक्ट्रिक वाहने बनविणाऱ्या उद्योगांचे हब होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पाचशे नवीन उद्योजक

तरुणांचा देश असलेल्या भारतात अनेक जण बेरोजगार आहेत. त्यांच्या हाताला काम देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा होणे गरजेचे आहे. यामुळे पदवीधर व बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी जिल्हानिहाय विशेष पॅटर्न राबविणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले.

तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून सातत्याने काम होत असून, जयहिंद उद्योजकता विकास केंद्रातून २०२४ अखेरपर्यंत ५०० नवीन उद्योजक बनवणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT