Indian Railway Sakal
नाशिक

Indian Railway : रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई; विनातिकीट प्रवाशांकडून 23 लाखांचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा

मनमाड : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वतीने विभागाच्या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर एकूण ८६ रेल्वे गाड्यात राबविण्यात आलेल्या एक दिवसीय विशेष तिकीट तपासणी मोहिमेत ३९१५ केसेस करून २३.२७ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे.

भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडीया यांच्या अध्यक्षतेखाली शिवराज मानसपुरे, मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागात वाणिज्य विभाग व आरपीएफ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खंडवा ते इगतपुरी, अमरावती ते भुसावळ, चाळीसगाव ते धुळे, जलंब ते खामगाव विभागाची एक दिवसीय तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली होती.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

तिकीट तपासणी मोहिमेत वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासनीस आणि आरपीएफचे संयुक्त पथक तयार करून सुमारे ८६ गाड्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये नाशिक, मनमाड, भुसावळ, खांडवा, अकोला, बडनेरा या स्थानकांवरही तपासणी करण्यात आली.

मोहीम यशस्वी करण्यासाठी ३ अधिकारी, १८० तिकीट चेकिंग स्टाफ, ४५ वाणिज्य स्टाफ व ५५ आरपीएफ स्टाफ असे एकूण २८० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये ओपन डिटेल स्टाफ यांनी ३४१९ केसेस करून १९ लाख ९७ हजार ५६५ रुपये, स्टेशन स्टाफ यांनी २०३ केसेस करून १ लाख ५ हजार २७० रुपये, अमेनिटी स्टाफ २९३ केसेस करून २ लाख २४ हजार २५१ रुपये वसूल केले. एकूण केसेस ३९१५ करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ कोटींची रोकड, ६ कोटींचे दागिने अन्...; काँग्रेस आमदाराकडे आढळलं घबाड, जप्त केलेल्या मुद्देमालाचा आकडा वाचून व्हाल थक्क

"माझ्या मुलाला वाचवा मी..." मुलाच्या जन्मावेळेस ढसाढसा रडू लागला गोविंदा; "गर्भलिंग निदान चाचणी.."

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाला तळणीचे की उकडीचे कोणते मोदक अर्पण करावे? वाचा पद्म पुराणात काय सांगितले

Crime News : नाशिक रोडला दरोड्याची तयारी करणाऱ्या पाच संशयितांना अटक; मोठा शस्त्रसाठा जप्त

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT