Consumer Protection esakal
नाशिक

Nashik : Indigo Airlinesला ग्राहक मंचाचा दणका!; अडीच लाखांच्या भरपाईचा आदेश

नरेश हाळणोर

नाशिक : विवाह सोहळ्यानिमित्ताने तिरुअंनतपुरम येथे जाण्यासाठी नाशिकच्या दोघा प्रवाशांना मुंबई ते चेन्नई व चेन्नई ते तिरुअनंतपुरम्‌ येथे जाण्यासाठी इंडिगो एअरलाईन्स या कंपनीचे दोन तिकिटे बुक केले. परंतु, ऐनवेळी कंपनीने विमानाचा पूर्वनियोजन मार्ग बदलला. तसेच, बदललेली फ्लाईटही रद्द करण्यात आल्याने दोघा प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. त्याविरोधात त्यांनी नाशिक जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेत दाद मागितली असता, न्यायालयाने इंडिगो एअरलाईन्स कंपनीला दणका देत दोघा प्रवाशांना प्रवासी भाडे व २ लाख ५० हजार रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. (Indigo Airlines hits consumer forum Order of compensation of two half lakhs Nashik News)

नाशिक येथील नलिन शाह, कविथा शाह (दोघे रा. सायंतारा अपार्टमेंट, कान्हेरेवाडी, सीबीएसजवळ, नाशिक) यांनी नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे इंडिगो एअरलाईन्स कंपनी व रोहन्स टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचे संजय बोरा यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. शाह यांना गेल्या ९ फेब्रुवारी २०१९ रोजी तिरुअनंतपुरम्‌ येथे विवाह सोहळ्यासाठी जायचे होते. त्यासाठी त्यांनी रोहन्स टुर्स मार्फत मुंबई ते चेन्नई व चेन्नई ते तिरुअनंतपुरम्‌ येथे जाण्यासाठी ३४ हजार ६२७ रुपये भरून इंडिगो एअरलाईन्स कंपनीचे तिकिटे काढली.

मात्र या विमान कंपनीने शाह यांच्या प्रवासाच्या तारखेच्या दोन दिवस आधीच नियोजित विमानाचा पूर्वनियोजित मार्ग बदलला. यामुळे शाह यांची गैरसोय झाली. एवढेच नव्हे तर, बदलण्यात आलेली फ्लाईटही रद्द करण्या आली. त्यानंतर शाह यांना विमान कंपनीने दुसऱ्या फ्लाईटची ऑफर दिली. मात्र ती फ्लाईटही विलंबाने मार्गस्थ झाली. या साऱ्या गोंधळामुळे त्यांची प्रवासात गैरसोय तर झालीच, शिवाय त्यांना विवाह सोहळ्यासाठी वेळेवर उपस्थितही राहता आले नाही.

या मानसिक व शारीरिक त्रासामुळे शाह यांनी नाशिक जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. यात आयोगाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, सदस्य सचिन शिंपी यांच्यासमोर कामकाज चालले. यावेळी शाह यांच्या वतीने ॲड. इंद्रायणी पटणी, ॲड. दीप्ती नाशिककर यांनी बाजु मांडली. आयोगाने यासंदर्भात इंडिगो एअरलाईन्स कंपनीला शाह यांना प्रवासाच्या भाड्याची रक्कम ३४ हजार ६२७ आणि तक्रारदारांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल २ लाख ५० हजार रुपयांची भरपाई तसेच, तक्रार अर्जाचा खर्च १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी रोहन्स टुर्सविरोधातील तक्रार फेटाळण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT