indigo car acci.jpg 
नाशिक

इंडिगो कार -मोटारसायकलचा भीषण अपघात; एक ठार, चार जखमी

धनंजय वावधने

सोग्रस (जि.नाशिक) : वडाळीभोई-धोडंबा रस्त्यावर (ता. ३१) रात्री झालेल्या अपघातात एक ठार, चार जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवले आहे. 

असा घडला अपघात
इंडिगो (एमएच ०२, बीवाय १२४२)मधून नितीन गांगुर्डे, पूर्वी गांगुर्डे व पौर्णिमा गांगुर्डे (वय २१, रा. वडनेरभैरव) तिघे धोडंबेकडे जात असताना एकरुखे येथील राजेंद्र खैरे (३४) व चिंतामण धनाईत (२२, दोघेही रा. एकरुखे) हे मोटारसायकलवरून येत असताना भायाळे फाटा शिवारात त्यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेने मोटारसायकलवरील राजेंद्र खैरे व चिंतामण धनाईत हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थ व पोलिसांनी पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

राजेंद्र खैरे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. १) पहाटे पाचला राजेंद्र खैरे यांचा मृत्यू झाला. चिंतामण धनाईत यांच्यावर उपचार सुरू आहेत. इंडिगोमधील नितीन गांगुर्डे, पूर्वी गांगुर्डे व पौर्णिमा गांगुर्डे तिघेही जखमी झाले असून, त्यांच्यावरदेखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास एकरुखे येथील अमरधाममध्ये राजेंद्र खैरे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phone Scam Sangli : फोन आला, वृद्ध घाबरले; सांगलीच्या दोघांना बेकायदेशीर व्यवहाराची भीती घालून ३७ लाखांना लावला चुना

Marathi Movie : मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Viral Video : कुत्रा भुंकताच घाबरुन रस्त्यावर पळाला तरुण, समोरुन ट्रक आला अन्..., हृदय पिळवटणारा  व्हिडिओ

Nashik Monsoon : परतीच्या पावसाची आशा: कमी पाऊस झालेल्या तालुक्यांना मिळणार दिलासा?

Rajasthan Anti-conversion Law : धर्म लपवून लग्न करताय? आता धर्मांतरासाठी कडक कायदा; जन्मठेपेसह 50 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा

SCROLL FOR NEXT