Industries and Manufacturers Association (NIMA) esakal
नाशिक

Nashik News : प्रदीर्घ काळानंतर ‘निमा’ चा कारभार सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : साडेतीन हजार उद्योजकांची जिल्ह्यातील शीर्ष संघटना मानल्या जाणाऱ्या नाशिक इंडस्ट्रीज अॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या विश्वस्त पदासाठी संबंधितांच्या मुलाखती झाल्यानंतर धर्मादाय सहआयुक्त टी. एस. अकाली यांनी २१ सदस्यांची नियुक्ती जाहीर केली. यात शशिकांत जाधव व तुषार चव्हाण गटाला डच्चू देण्यात आला आहे, तर बेळे, पाटणकर गटाला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.

निमाच्या विश्वस्त पदासाठी २ ते ४ जानेवारी असे तीन दिवस दररोज दुपारी २ ते सायंकाळी सहापर्यंत ३६ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. (Industries and Manufacturers Association (NIMA) started Appointment of 21 members announced Nashik News pvc99)

या पदाकरिता ४० इच्छुकांनी अर्ज दाखल केलेले होते. पहिल्या दिवशी पंधरापैकी बारा उमेदवारांनी हजेरी लावून मुलाखती दिल्या, तर दुसऱ्या दिवशी तेरा उमेदवार, तर शेवटच्या दिवशी नऊ जणांनी असे एकूण चाळीसपैकी ३६ जणांनी मुलाखती दिल्या होत्या.

गुरुवारी (ता. ५) धर्मदाय सहआयुक्त टी. एस. अकाली यांनी या सर्व उमेदवाराचे ऐकून घेत त्यापैकी २१ विस्वस्त सदस्यांची नियुक्ती करत अधिकृत यादी लावण्यात आली आहे. यामुळे कोरोनापासून बंद पडलेले निमाचे काम पुन्हा सुरू होण्यास मदत होणार आहे.

कोरोनाकाळात खऱ्या अर्थाने उद्योजकांना संघटनेची गरज असताना तिन्ही गटातील अंतर्गत वादामुळे व शासनाच्या स्तरावर एकमेकांच्या विरोधात तक्रारी केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सदर संस्थांचे सर्व पदाधिकाऱ्यांकडून कारभार काढून तो धर्मदाय सहआयुक्त कार्यालयाकडे सोपवला होता. तसेच, याबाबत तोडगा काढण्याचेही सांगितले होते.

हेही वाचा : ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

दरम्यान, धर्मदाय सहआयुक्तांनी सर्व गटाला एकत्रित करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला, परंतु, तोडगा निघू न शकल्याने ऐन कोरोनात संघटनेचे कामकाज ठप्प झाले होते. आता प्रदीर्घ काळानंतर निमाचा कारभार सुरू होणार असल्याचे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यांची झाली नियुक्ती

जयंत जोगळेकर, संजय सोनवणे, राजेंद्र वडनेरे, वैभव जोशी, विरल ठक्कर, राजेंद्र अहिरे, श्रीधर व्यवहारे, सुकुमारन नायर, किशोर राठी, गोविंद झा, शिवकुमार मित्रा, आशिष नहार, संदीप भदाणे, धनंजय बेळे, राजेंद्र झोपे, मिलिंद राजपूत, सुधीर बडगुजर, जितेंद्र आहेर, हर्षद ब्राह्मणकर, मनीष रावल नितीन वाघस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT