12345.jpg 
नाशिक

नशिबी दुर्देवच! नवऱ्यासोबत भांडणामुळे बहिणीकडे आली...तिथेच समजली खळबळजनक बातमी

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (त्र्यंबकेश्वर) तालुक्यातील अंबोली ग्रामपंचायत हद्दीतील बोंबीलटेक या वस्तीवर सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील महिला नवऱ्यासोबत भांडण झाल्याने मावस बहिणीकडे आली होती. काही दिवस तिथे थांबली अन् तेवढ्यात समजली खळबळजनक बातमी घरातील सगळ्यांना घामच फुटला अन् मग...

आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

शुक्रवारी (ता. 9) तारखेला अंबोली येथे बोंबीलटेकवाडी या वस्तीत सदर महिला मावस बहिणीकडे आली असता या महिलेच्या पतीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजले. सदर माहीती अंबोली येथील पोलीस पाटील ज्ञानेश्वर मेढे, सरपंच चंद्रभागा लचके यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र अंबोली येथे कळवले असता तत्काळ येथील आरोग्य सेवक डॉ. घोरसडे, डॉ. भोई व त्यांची टीम जागेवर येऊन प्राथमिक चौकशी करण्यात येऊन सदर महिलेला ब्रम्हा व्हँली येथे हलवण्यात आले असून संपर्कात आलेल्या दहा लोकांचे स्वॅब घेऊन चौकशीसाठी नाशिक पाठवण्यात आलेले होते. यांपैकी आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे असे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मोरे यांनी सांगितले. सध्या त्यांना स्वामी समर्थ गुरुपिठ येथे क्वारंटाइन करण्यात आलेले आहे.

परिसरात राहत असलेल्या नागरिकांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतच्या वतीने बोंबीलटेक येथे औषध फवारणी करण्यात आली. स्वत:च्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहीती देण्यात आली व योग्य उपाययोजना करण्यास सांगण्यात आले. तालुका प्रशासनाने येथील वाडी 300 मिटर परिसर प्रतिबंधित करण्यात आले. गावात नागरिकांना फिरण्यास सक्त बंदी करण्यात आली. कुणीही रिकामी जमाव करु नये याबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही होणार विलंब? गिरगाव चौपाटीवरील 'त्या' नैसर्गिक कारणामुळे वाढली चिंता; प्रशासनासमोर मोठं आव्हान

‘आईला सोडून कसा जाऊ? आधी तिला बाहेर काढतो’... शेवटपर्यंत झुंजला, अखेर बस आगीत माय-लेकाचा मृत्यू; अंगठीवरून पटली ओळख

‘तुम्हाला काय प्रॉब्लेम?’ सततच्या चर्चांवर गोविंदांचा सवाल; म्हणाला...‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू नका’

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT