Inflation has risen in the market  
नाशिक

कोरोनामुळे रोजगार गेला, आता दिवाळी कशी होणार? वाढलेल्या महागाईचे सामान्यांना चटके

नीलेश छाजेड

नाशिक/एकलहरे : ऐन दिवाळीत जीवनावश्यक वस्तूंच्या दारात वाढ झाली आहे, आधीच कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले होते तर बऱ्याच कंपन्यांमध्ये २०-३० टक्के पगार कपात अजून ही सुरू आहे त्यामुळे चाकरमान्यांना व सर्वसामान्यांना या भडक्याचा तडाखा जोरदार बसणार आहे.

खरेदी करताना काटकसर

गेल्या दहा वर्षात अनेक वस्तूंचे दर दुपटीने वाढलेले आहेत. रवा, मैदा, भाजके पोहे, मुरमुरे, खोबरे आदींच्या दरात हा प्रभाव दिसून येतो. दिवाळी सणासाठी करंजी, चिटोरे, चिवडा आदी फराळाच्या वस्तू बनविण्यासाठी ही सामुग्रीचा वापर केला जातो.
दिवाळी सणासाठी रेडिमेड फराळाची मागणी ही मोठ्या प्रमाणात असते. 
यंदा कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे परंतु जिथे पाच हजाराची खरेदी होते तिथे हात आखडता घेत दोन ते अडीच हजाराची खरेदी करीत काटकसर करतांना दिसून येत आहेत.

वस्तूंच्या दरामध्ये झालेली वाढ (रुपये)

 वस्तू          भाव  २०१०       भाव  २०२० 
रवा          १८ ते २०            ३० ते ३२
मैदा         १८ ते २०            ३० ते ३२ 
पि.साखर  ३० ते ३२              ३८ ते ४२
भा. पोहे    ३५ ते ४०            ६५ ते ७०
शेंगदाणे    ६५ ते ७०          ११० ते ११५
खोबरे   ११० ते ११०           २१० ते २२०

यंदा कोरोना काळात मिल बंद असल्याने व कच्च्या मालाचा तुटवडा झाल्याने दरामध्ये काहीशी तफावत दिसून येत आहे.
तुषार बाफना (किराणा व्यावसायिक)
 

गेल्या दहा वर्षात ले दर पाहता अनेक वस्तूंचे दर दुपटीने वाढलेले दिसून येतात. कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले होते त्यामळे सर्वसामान्यांची दिवाळी ही दिवाळे काढणार असेच दिसते.
रेखा चौधरी (गृहिणी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT