Inflation esakal
नाशिक

Inflation : कुटुंबाच्या बचतीवर महागाईची कुऱ्हाड; मासिक फॅमिली बजेट वाढीने होतेय कसरत!

सकाळ वृत्तसेवा

Inflation : वीज बिल, इंधनासह काही खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे असंख्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे महिला वर्गाला फॅमिली बजेट चुकू नये म्हणून कमालीची कसरत करावी लागत आहे.

दरवाढीमुळे कुटुंबाच्या बचतीवर महागाईची कुऱ्हाड कोसळल्याने कुटुंबप्रमुखही चिंतेत आहेत. साहजिकच ते खर्चाला मर्यादा घालत असल्याने व्यापाराच्या उलाढालीवर सरासरी ४० टक्के परिणाम झाला आहे. (Inflationary on household savings monthly family budget increasing Dhule news)

स्वयंपाकघरात आवश्यक असलेले जिरे केवळ पंधरा दिवसांत महागले आहे. होलसेल मार्केटमध्ये पंधरा दिवसांपूर्वी सरासरी ३६० रूपये प्रतिकिलो असणारे जिरे तब्बल ४८० रूपयांवर पोचले आहे.

यात पंधरा दिवसांतच १२० रूपये प्रतिकिलोने वाढ झाली आहे. या दरवाढीमागचे नेमके कारण अनेक दुकानदारांना समजेनासे झाले आहे.

तसेच, प्रतिकिलोत तूरदाळ थेट २० ते २५ रूपये, चनादाळ ४ ते ५ रूपये, मूगदाळ १० ते १२ रूपये, शेंगदाणा तेल ५ रूपये, गुळ ५ ते ७ रूपये गहू ४ ते ५ रूपये, विविध प्रकारच्या मिरचीत २० ते ३० रूपयांनी वाढ झाल्याने खर्चाचे गणित जुळविताना महिला वर्गाची ओढाताण होत आहे.

महिलांच्या नाकी नऊ

वीज बिल, इंधन, भाजीपाला, रोजचा इतर दैनंदिन खर्च, शिवाय अवकाळी पाऊस व व्हायरल इन्फेक्शनमुळे आरोग्याच्या काळजीतून वाढलेल्या खर्चामुळे प्रत्येक कुटुंब हैराण झाले आहे.

दिवसागणिक महागाईची कुऱ्हाड कोसळत असल्याने खर्चाला मर्यादा आणि बचतीवर परिणाम होत असल्याने कुटुंबप्रमुख चिंतेच्या गर्तेत आहेत. तर मिळकतीच्या तुलनेत फॅमिली मासिक बजेट चुकत चाललेल्या कुटुंबातील महिलांना खर्चाचे गणित जुळविताना नाकी नऊ येत आहेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

वेगळ्या भुर्दंडाचा प्रश्‍न

पेट्रोल- डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरचे दरही ग्राहकांच्या आवाक्यात राहिलेले नाहीत. त्याचा परिणाम दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. यात आनुषंगिक प्रत्येक वस्तू, पदार्थ खरेदीवर होत आहे.

त्यामुळे कुटुंबप्रमुखासह गृहिणीला नव्या खरेदीस ब्रेक मारावा लागत असल्याचे चित्र आहे. एप्रिलपासून अनेक सेवांचे दर, विमा हप्ता आणि `इएमआय` वाढल्याने वेगळा भुर्दंड त्या- त्या कुटुंबाला सोसावा लागत आहे.

दरवाढीमुळे सामान्यांच्या तर तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र आहे. साहजिकच कुटुंबाच्या बचतीचे गणित बिघडू लागले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सामान्य फॅमिलीचे सरासरी मासिक बजेट/सरासरी

* गॅस सिलिंडरसह मासिक किराणा.........६,५००

* घरभाडे किंवा हप्ता.........................९,०००

* शालेय शुल्क, इतर खर्च...................५,०००

* प्रवास खर्च, पेट्रोल, रिक्षा..................३,०००

* नॉनव्हेज किंवा फळे........................१,२००

* आजारपण- औषधी.........................१,०००

* भाजीपाला....................................१,०००

* तिघांचा मोबाईल खर्च........................८००

* केबल खर्च (सरासरी)........................५१०

* उपकरणे दुरुस्ती खर्च..........................५००

"घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान बंद आहे आणि त्याचे दर अकराशे रूपयांवर गेले आहेत. एक किलो शेंग तेलासाठी १९० रुपये लागतात. डाळी महाग झाल्या आहेत. मुलांचा शालेय खर्च वाढता आहे. त्यामुळे कुटुंबाचे मासिक बजेट सरासरी दीड ते दोन हजारांवर वाढला आहे. दरवाढीमुळे खर्चास मर्यादा आणि अधिक काटकसर करावी लागत आहे."

- हर्षाली पाटील, गृहिणी, धुळे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT