Navdapantya unveiling his company logo esakal
नाशिक

Unique Wedding : ऐकावं ते नवलच! विवाह दिनी सुरु केली महिलांची उत्पादक कंपनी

रवींद्र पगार: सकाळ वृत्तसेवा

Nashik News : समाजामध्ये दररोज हजारो विवाह पार पडत असतात, आपला विवाह संस्मरणीय रहावा असे प्रत्येकाला वाटते. मग त्यासाठी कोणी पैशाची उधळपट्टी करतो, तर कोणी लाखों रुपयांचे शाही भोजन देतात.

कुणी रोशनाई ची आतिषबाजी करतात तर कोणी हेलीकॉप्टर ने एंट्री करतात. परंतु कळवण मध्ये एक आगळा वेगळा विवाह बघायला मिळाला, व याची सर्वत्र चर्चा आहे. (innovative wedding ceremony held in Kalwan Launched women manufacturing company on day of marriage Nashik News)

भारत आपला कृषिप्रधान देश आहे. यामध्ये शेती व शेती व्यवसाय वर 65 % लोकसंख्या अवलंबून आहे. सध्या ग्रामीण व शहरी भागेत कृषिपूरक विविध व्यवसाय सुरू झालेले आपल्याला बघायला मिळतात, तसेच शेतकरी उत्पादक कंपनी तयार होऊन देखील अनेक शेतकरी व युवा वर्ग व्यवसाय करतांना बघायला मिळतात.

लग्न सोहळा प्रत्येक व्यक्ति वेगवेगळया पद्धतीने करतो, कारण हा अविस्मरणीय दिवस असतो, आपल्या लग्नाच्या आनंदांच्या व महत्वपूर्ण दिवसात नवदाम्पत्य फक्त लग्नात व्यस्त असतात. कळवणमध्ये श्वेता व प्रतीक यांचा विवाह दिनांक 11 जून रोजी पार पडला, भेंडी येथील शेतकरी यशवंत रौदंळ यांची कन्या तसेच कृषि उद्योजक, कृषीभूषण ग्रोवर्स कंपनीचे चेअरमन भूषण निकम यांची भाची श्वेता व वाखारवाडी येथील प्रशांत भाउराव निकम यांचे सुपुत्र व गिरणा कृषी सेवा संचालक बंटी पाटील पाळे यांच्या भाचा चि. प्रतीक यांचा विवाह संपन्न झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या नाव दाम्पत्य यांनी विवाह दिवशी आपले काही नातेवाईक व सहकारी १० महिला मनीषा भामरे, रोहिणी पाटील, श्वेता रौदंळ, वंदना निकम, महेश्वरी गवारे, सीमा पगार एकत्र येऊन वुमन्स एंम्पॉवर प्रोड्यूसर कंपनी लि. या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली.

“ग्रामीण भागेतील शेतकरी महिला व शिक्षण झालेल्या मुलींना आपल्या गावातच रोजगार मिळावा, त्यांना ग्रामीण भागेत शेतीपुरक व्यवसाय करता यावा, त्यांना त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण व मदत मिळावी यासाठी ही त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी तयार केली असे कंपनीचे अध्यक्ष व नववधू श्वेता यांनी सांगितले. विवाह सोहळ्यात कंपनी लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करून या कंपनीचा शुभारंभ करण्यात आला.

या लग्न सोहळ्यास कळवण मतदार संघाचे विधानसभा आ. नितीन पवार, कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार,मप्रविचे संचालक रवींद्र देवरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, कृषीभूषण महा एफपीओ फेडरेशनचे अध्यक्ष भूषण निकम, बाजार समिती संचालक भरत पाटील, सुधाकर खैरणार, आदि मान्यवर उपस्थित होते.

"शेतीमध्ये प्रचंड अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत, परंतु तितक्याच मोठ्या प्रमाणात कृषि व्यवसायमध्ये संधी वाढत आहेत, उच्चशिक्षित पिढीने यापुढे शिक्षण घेऊन कृषि व्यवसायातून आपले भविष्य घडवावे, लग्न सोहळ्यामधून असे संदेश समाजाला जाने खूप गरजेचे आहेत. श्वेताने घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहे."

भूषण निकम (चेअरमन- कृषीभूषण महाएफपीओ फेडरेशन)

"ग्रामीण भागेत महिला फक्त शेतीवर अवलंबून आहेत, शेतीचे उत्पन्न निसर्गावर अवलंबून आहे त्यामुळे त्यांना पूरक व्यवसायाचे प्रबोधन व मार्गदर्शन साठी ही कंपनी तयार केली आहे. यातून निश्चितच महिलांना रोजगार मिळणार आहे."

– श्वेता रौदंळ-निकम (चेअरमन वुमन्स एंम्पॉवर प्रोड्यूसर कंपनी लि.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT