corona dead bodies.jpg 
नाशिक

धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेह नातेवाईकांना काढून नेण्यास सांगितले; वैद्यकीय अधीक्षकांनी मागविला खुलासा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाने मृत्यू झालेल्या वृद्धाचा मृतदेह रुग्णालयातून नातेवाइकांना घेऊन जाण्यास सांगण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी (ता. ३) डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात घडला. याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत वैद्यकीय अधीक्षकांनी रुग्णालयप्रमुखांकडून लेखी स्वरूपात खुलासा मागविला आहे. 

कोरोनाबाधिताचा मृतदेह नेल्याप्रकरणी चौकशी सुरू 
चांदवड येथील विमल सोनवणे (वय ६५) यांना कोरोनाची लागण झाल्याने महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधिताचा मृतदेह रुग्णालयातील कर्मचारी आवश्‍यक ती काळजी घेत अमरधामपर्यंत पोचवितात. अन्य कुणास लागण होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. असे असताना संबंधित वृद्ध महिलेचा मृतदेह कर्मचारी नसल्याने सहा तास वॉर्डात पडून होता. त्यानंतर सकाळी नातेवाईक आले असता, त्यांनाच रुग्णालयातून मृतदेह काढून नेण्यास सांगण्यात आल्याचा प्रकार घडला.

लेखी स्वरूपातील अहवाल सादर करण्याच्या सूचना

शुक्रवारी (ता. ४) ‘सकाळ’मध्ये वृत्त आल्यानंतर महापालिका वैद्यकीय अधीक्षकांनी दखल घेत चौकशी सुरू केली आहे. रुग्णालयात काय प्रकार घडला आहे, कुणी नातेवाइकांनी मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले, याचा सविस्तर लेखी स्वरूपातील अहवाल रुग्णालयप्रमुखांनी सादर करण्याच्या सूचना वैद्यकीय अधीक्षकांनी दिल्या. 

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT