Durva Bhamre from Khuntewadi taking cricket lessons in South Africa. esakal
नाशिक

Inspirational Story: खुंटेवाडीच्या लहानग्या दूर्वाची द. आफ्रिकेत क्रिकेटमध्ये भरारी!

मोठाभाऊ पगार

देवळा : मुलांच्या आवडीनुसार कुटुंबीयांनी योग्य मार्गदर्शन व वेळ दिला तर कोणत्याही क्षेत्रात यश दूर नसते, हे सिद्ध केले आहे, नऊ वर्षांच्या येथील दूर्वा सचिन भामरे या खुंटेवाडीच्या कन्येने. (Inspirational Story little village of Khuntewadi Cricket boom in south Africa nashik)

मूळचे खुंटेवाडी येथील रहिवासी असलेले सचिन भामरे हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, नोकरीनिमित्त पुणे व सध्या दक्षिण आफ्रिकेत आहेत. विदेशात नोकरी, संसार आणि स्वतःचा ‘ड्रीम हॉलिडे’ हा व्यवसाय सांभाळत त्यांनी एक सजग पालकत्वाची जबाबदारीही पार पाडली.

आपल्या कन्येची आवड लक्षात घेऊन त्यांनी तिला क्रिकेट खेळात प्रोत्साहन दिले, याची परिणती म्हणजे त्यांच्या अवघ्या नऊवर्षीय कन्या दूर्वाचे यश.

आपल्या मेहनत व चिकाटीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेतील राज्यस्तरावरील १३ वर्षांखालील वयोगटातील क्रिकेट सामन्यांसाठी तिची गॉटेंग राज्याकडून निवड झाली आहे.

दूर्वा ही सध्या जोहान्सबर्ग येथील मॉंटरोज प्रायमरी स्कूलमध्ये तिसरीत शिकत असून, लहानपणापासूनच तिला क्रिकेटची आवड असल्याचे कुटुंबीयांनी हेरले व तसे प्रशिक्षण ते देत गेले.

दोन वर्षांपासून जोहान्सबर्ग येथील झुलेक क्रिकेट ॲकॅडमी येथे जिमी कूक व अबनिसा कोहले या आंतरराष्ट्रीय माजी खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली ती क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे.

नियमित सराव व खेळाला पोषक आहार ती घेत असून, अगदी कमी वयात तिच्या परदेशातील राज्यस्तरावरील निवडीने कौतुक होत आहे.

"खुंटेवाडी गावातील अनेक तरुण भारत व जगातील काही देशांत नोकरीनिमित्त स्थिरावले आहेत. त्यांचे कार्यकर्तृत्व निश्चितच उल्लेखनीय आहे. त्यातील दूर्वाची विदेशात क्रिकेटमध्ये झालेली निवड गावासाठी अभिमानाची बाब आहे."

- भाऊसाहेब पगार, माजी सरपंच, खुंटेवाडी (ता. देवळा)

"मुळात दूर्वाला असलेली क्रिकेटची आवड व तिचे उपजत खेळण्याचे कौशल्य यामुळे तिची राज्य संघात निवड झाली. क्रिकेटचा नियमित सराव करीत असताना अभ्यास व शाळेच्या विविध उपक्रमांतील तिचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे. क्रिकेटमधील तिचे भविष्य उज्ज्वल आहे."

- जिमी कूक, अबनिसा कोहले (प्रशिक्षक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT