Kazi Gadhi Latest marathi news
Kazi Gadhi Latest marathi news esakal
नाशिक

काझी गढीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादरच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दरवर्षी पावसाळ्यात (Monsoon) ढासळणाऱ्या काझी गढीला संरक्षक भिंत बांधण्यासाठी पन्नास कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेकडे (NMC) निधी नसल्याने शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना नगरविकास विभागाने महापालिकेला दिल्या आहेत.

तर, काझी गढीच्या जागेवर इच्छुक बांधकाम व्यावसायिकांना अधिकचा एफएसआय देऊन पुनर्विकास किंवा एसआरए योजना राबविण्याची चाचणी महापालिकेकडून केली जात आहे. (Instructions for submission of proposal to PWD for Kazi Gadi nashik Latest Marathi news)

गेल्या अनेक वर्षांपासून जुने नाशिकच्या काझी गढीचा प्रश्न प्रलंबित आहे. पावसाळ्यापूर्वी गढीवासीयांना नोटिसा बजावण्याचे काम महापालिकेकडून होते. पावसाळा गेल्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे-थे होते.

मात्र, दुर्घटना घडल्यानंतर आरोप- प्रत्यारोप होतात. ठोस अशा उपाययोजना होत नाही. काझी गढीला संरक्षक भिंत बांधल्यास ढासळण्याचा प्रश्न निकाली लागेल. परंतु, संरक्षक भिंत बांधायची कोणी, यावरून अद्यापपर्यंत वाद सुरू आहे.

महापालिकेने स्मार्टसिटी कंपनीकडे जबाबदारी सोपवली. परंतु, कंपनीकडून नकार देण्यात आला. यापूर्वी गाडगे महाराज धर्मशाळेपर्यंत महापालिकेने संरक्षक भिंत उभारली आहे. त्याच अनुषंगाने उर्वरित काम पूर्ण करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मात्र, महापालिकेने सदरची जागा खासगी असल्याने संरक्षण भिंत बांधण्यास नकार दिला. त्यानंतर ५० कोटी रुपये खर्च येणार असल्याने महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याचे कारण देण्यात आले. सदर विषयावरून टोलवाटोलवी होत असल्याने महापालिकेने शासनाच्या नगरविकास विभागाकडे अभिप्राय मागविताना जागे संदर्भातील माहितीदेखील दिली.

त्या अनुषंगाने नगरविकास विभागाने शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काझी गढीला संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे पत्र महापालिकेला दिले आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने संरक्षक भिंत बांधल्यास अनेक वर्षांचा काझी गढीचा प्रश्न निकाली लागू शकतो. काझी गढीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्याशिवाय सदर जागेवर खासगी मालकांनी दावा केला आहे. अशा परिस्थितीत शासकीय यंत्रणांना येथे विकासकामे करणे अशक्य आहे. संरक्षक भिंत कधी उभारली जाईल, याबाबत शाशंकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मी वाचलो पण माझ्या डोळ्यासमोर लोक चिरडले"; प्रत्यक्षदर्शीच्या शब्दात होर्डिंग कोसळल्याची थरारक कहाणी वाचा...

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, कोणत्या क्षेत्रात खरेदी?

GPT-4o : मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारतो, व्हिडिओ पाहून सगळं ओळखतो.. Open AIचं सर्वात अ‍ॅडव्हान्स एआय टूल लाँच; पाहा व्हिडिओ

Amey Wagh: "आता कुठल्याही पक्षात जावं आणि कोणाही बरोबर युती करावी..."; मतदानानंतर अमेय वाघची खरमरीत पोस्ट

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपच्या शेड्यूलमध्ये गडबड, 24 तासांपेक्षा कमी अंतरात सेमीफायनल अन् फायनल?

SCROLL FOR NEXT