Investigation of former mayor vinayak Pandey today Nashik MD Drug Case news esakal
नाशिक

Nashik MD Drug Case : माजी महापौर पांडेंची आज चौकशी; एमडी ड्रग्ज कनेक्शनवरून पोलिसांकडून पाचारण

सकाळ वृत्तसेवा

Nashik MD Drug Case : एमडी ड्रग्जमाफिया ललित पाटील (पानपाटील) याच्याशी कनेक्शन असल्याच्या कारणातून माजी महापौर व शिवसेना नेते विनायक पांडे यांची नाशिक शहर गुन्हे शाखेकडून शुक्रवारी (ता. २७) चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याप्रकरणी पांडे यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या कोणत्याही चौकशी आपण सामोरे जाण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले.

एमडी ड्रग्जमाफिया ललित पाटील मूळचा नाशिकचा आणि त्यातही तो शिवसेनेचा पदाधिकारी असल्याने त्याचा संबंध शहरातील शिवसेना नेत्यांशी असल्याचे मानले जात आहे. ललित पाटील याच्याकडे असलेला वाहनचालक पूर्वी विनायक पांडे यांचा वाहनचालक होता, असे पोलिस तपासातून समोर आले होते. (Investigation of former mayor vinayak Pandey today Nashik MD Drug Case news)

त्यावरून पोलिसांकडून पांडे यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत होती. यावर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून टीका केली जात होती. या पार्श्वभूमीवर विनायक पांडे यांनी गुरुवारी (ता. २६) शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना धुडकावून लावत पोलिसांच्या कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.

श्री. पांडे म्हणाले, की त्यांच्याकडे बारा वर्षे वाहनचालक असलेल्या अर्जुन परदेशी याला आजारपणामुळे काढून टाकले होते. त्यानंतर तो ललित पाटीलकडे चालक म्हणून गेला. पाटील याला शिवसेनेत प्रवेश करायचा असल्याने तेव्हाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर प्रवेश झाला.

त्याच्याशी आपला कधीही थेट संबंध आला नाही. आपण पोलिसांच्या कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगत, आपली राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्यासाठीच हे कारस्थान रचले आहे.

पोलिस नोटीस बजावणार

एमडी ड्रग्ज‌ प्रकरणाचा तपास नाशिक शहर गुन्हेशाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडून सुरू आहे. सामनगाव, वडाळागाव आणि शिंदेगाव या तीन गुन्ह्यांमध्ये पोलिस ‘एमडी’चे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी संशयितांच्या मागावर आहेत.

छापासत्रही राबविले जात असून, त्यातूनही काही प्रमाणात ‘एमडी’ ड्रग्जचा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे. संशयिताचा शोध घेण्यासाठी काही पथके परजिल्ह्यात रवाना करण्यात आली आहेत. माजी महापौर विनायक पांडे यांचेही नाव समोर आल्याने गुन्हेशाखेकडून त्यांच्याही चौकशीची शक्यता आहे. त्यासाठी त्यांना नोटीस बजावली जाणार आहे.

अशीही चर्चा

विनायक पांडे यांचा या प्रकरणाशी तसा फारसा संबंध नसताना केवळ राजकीय वैरभावनेतून त्यांना गुंतविले जात असल्याची चर्चा आहे. यासाठी एका ‘शक्ती’ने पोलिसांच्या खांद्याचा वापर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एरवी ‘एमडी’ प्रकरणात प्रसारमाध्यमांशी दुरावा राखणाऱ्या पोलिसांनी याबाबत मात्र सढळ हाताने पुरविलेली माहिती कोणत्या बोलविता धन्याच्या आशीर्वादाने दिली, याचीही चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT