lalit patil Esakal
नाशिक

Lalit Patil Drug Case: ‘ललित’ला घेऊन पुण्याचे तपास पथक नाशिकमध्ये; एमडी ड्रग्ज प्रकरणी धागेदोरे हाती

The investigation team of Pune took Lalit to Nashik; Threads in hand in MD drugs case

सकाळ वृत्तसेवा

Lalit Patil Drug Case :

एमडी ड्रग्ज माफिया ललित पाटील (पानपाटील) यास पुणे पोलिसांनी गुरुवारी (ता. २) तपासकामी नाशिकमध्ये आणले होते. पुणे पोलिसांकडून याबाबत अतिशय गोपनीयता पाळण्यात आली होती.

दरम्यान, पुणे पोलिसांच्या हाती आणखी काही ऐवज लागल्याचे समजते. (investigation team of Pune took Lalit to Nashik news)

पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार घेत असताना ड्रग्ज विक्री करणारा ललित पाटील पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. ललितला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली होती. मुंबई पोलिसांकडून दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेतला.

ससून रुग्णालयातून ललितने पलायन केल्यावर तो नाशिकमध्ये आला असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. त्याची प्रेयसी प्रज्ञा कांबळेकडून २५ लाख रुपये घेऊन तो चेन्नईला गेला होता. याच संदर्भात तपासकामी पुणे पोलिसांनी ललितला गुरुवारी नाशिकमध्ये आणले.

ललितच्या दोन साथीदारांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीतून आठ किलो सोन्याच्या विटा व काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. ललितला चाकण ड्रग्ज कारखान्याच्या प्रकरणात अटक झाल्यावर भूषण पाटील याने व्यवसाय सांभाळला. त्यातूनच त्यांनी शिंदे गावात कारखाना सुरू केला होता.

याच तपासाच्या अनुषंगाने ललितला गुरुवारी नाशिकमध्ये आणण्यात आले होते. नाशिक रोड परिसरातील ललितच्या घरी तसेच त्याची प्रेयसी प्रज्ञा हिच्या घरी नेऊन तपास करण्यात आल्याचे समजते. तपास अधिकारी व सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्यासह पुणे शाखेचे पथक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT