Invitation to 75 thousand families of Sinnar taluka for ayodhya Shri Ram Mandir public offering ceremony
Invitation to 75 thousand families of Sinnar taluka for ayodhya Shri Ram Mandir public offering ceremony  esakal
नाशिक

Ayodhya Ram Mandir: श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे सिन्नर तालुक्यातील 75 हजार कुटुंबांना निमंत्रण!

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : प्रभू श्रीरामचंद्र जन्मभूमी न्यासच्या वतीने साकारण्यात आलेल्या अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे सिन्नर तालुक्यातील सुमारे 75 हजार कुटुंबांना देण्यात आले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अयोध्या येथून पाठवण्यात आलेल्या अभिमंत्रित निमंत्रण अक्षता प्रत्येक गावात वितरित करण्यात येत असून स्थानिक स्वयंसेवकांच्या माध्यमातून या अक्षता प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (Invitation to 75 thousand families of Sinnar taluka for ayodhya Shri Ram Mandir public offering ceremony nashik)

येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी सकल हिंदू समाजाला श्रीराम जन्मभूमी न्यास च्या वतीने निमंत्रण रुपी अक्षता पाठवण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात व गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत या अक्षदांचे वितरण करण्यात येत असून अक्षता सोबतच लोकार्पण सोहळ्याची नियोजन पत्रिका तसेच श्रीराम मंदिराचा फोटो देण्यात आला आहे.

सिन्नर शहरात व तालुक्यात सुमारे 75 हजार कुटुंबांपर्यंत हे निमंत्रण पोहोचवले जात आहे. त्यासाठी सिन्नर शहरातील एका उपखंडासाठी 25 अक्षता कलश उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

तर तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्येकी 27 गावांचा मिळून असलेल्या सहा उपखंडामध्ये देखील गाव निहाय निमंत्रण अक्षता वितरित करण्यात आल्या आहेत. श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यात मोठ्या संख्येने सकल हिंदू समाजाला अप्रत्यक्षपणे सहभागी करून घेतले जाणार आहे.

त्यासाठी प्रत्येक गावातील मंदिरांमध्ये स्थानिक पातळीवर अयोध्येतील सोहळा लाईव्ह प्रक्षेपित करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सिन्नर खंडासाठी प्राप्त झालेल्या निमंत्रण अक्षता कलशांची ठीकठिकाणी मिरवणूक काढण्यात आली.

उस्फूर्तपणे नागरिकांनी या कलशांचे स्वागत केले. सिन्नर शहरासोबतच ग्रामीण भागातील सोनारी, वावी , नांदूर शिंगोटे, बारागाव पिंपरी, वडांगळी या ठिकाणी एकत्रित येत त्या त्या भागातील नागरिकांनी भव्य मिरवणुका काढल्या.

त्यानंतर गावातील श्रीराम मंदिरातून उपखंडनिहाय गावांमध्ये निमंत्रण अक्षता कलश वितरित करण्यात आले. गावोगावी पाठवण्यात आलेल्या अभिमंत्रित अक्षतांचे वाटप प्रत्येक घरापर्यंत केले जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबतच विविध सामाजिक मंडळांची मदत घेतली जात आहे.

नागरिकांनी या मंगल अक्षरांचा स्वीकार करून श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यात आपल्या घरातून, गावातून सहभागी व्हावे असे आवाहन संघाचे सिन्नर तालुका कार्यवाह समाधान गायकवाड, सहकार्यवाह संदीप व्यवहारे, जिल्हा पर्यावरण संवर्धन विभाग प्रमुख डॉ. महावीर खिवंसरा, सिन्नर तालुका व्यवस्थाप्रमुख संतोष शेलार आदींनी केले आहे.

"अयोध्येतील श्रीराम जन्मस्थान मंदिर उभारणी ही प्रत्येक हिंदूसाठी अभिमानाची बाब आहे. अनेक शतकांची मागणी प्रत्यक्ष फळाला आली आहे. त्यासाठी अनेक पिढ्यांना संघर्ष करावा लागला. हा संघर्ष या पुढच्या पिढीने विसरून चालणार नाही. श्रीराम जन्मभूमी मंदिर हे केवळ स्मारक नाही तर ते सर्वांसाठी प्रेरणास्थान असेल. मंदिर लोकार्पणाचा मुख्य सोहळा प्रत्येकाने आपल्या घरातून टीव्ही समोर अथवा मंदिरात एकत्र येऊन स्क्रीनवर बघावा. या दिवशी मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम महाआरतीचे आयोजन करावे."

- दिलीप क्षीरसागर (उत्तर महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख, रा स्व सं 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: विंडिजविरुद्ध PNG च्या सेसे बाऊचं विक्रमी अर्धशतक, तर रसेलचा IPL नंतर वर्ल्ड कपमध्येही गोलंदाजीत जलवा

Loksabha Election Result : भाजपचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला; मतमोजणीसंदर्भात केल्या या 'चार' मागण्या

BJP President : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच भाजपचा अध्यक्ष बदलणार; 'या' तीन नावांची आहे चर्चा

Lok Sabha Election Result : सत्ता आल्यास पहिल्या १०० दिवसात काय करणार? लोकसभेच्या निकालापूर्वी PM मोदींची अधिकाऱ्यांसोबत खलबतं

Exit Poll Result: खरंच ४०० पार! देशात यापूर्वी झालं होतं शक्य; कसं अन् कधी वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT