doctors-1.jpg 
नाशिक

धक्कादायक! खासगी रुग्णालयांकडून कोविड उपचारात अनियमितता...कारवाईची शक्यता

सकाळ वृ्त्तसेवा

नाशिक : खासगी रुग्णालयांनी कोविड-१९ रुग्ण दाखल करताना महापालिकेच्या डॅशबोर्डवर माहिती अपडेट करण्याबरोबरच, उपचाराचे दर दर्शनी भागावर लावणे बंधनकारक करण्यात आले. मात्र सूचनांचे पालन होत नसल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी रुग्णालयांमध्ये थेट भरारी पथक घुसविले. खासगी रुग्णालयांकडून अनियमितता होत असल्याचे निदर्शनास आल्याने या रुग्णालयांना कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

एकूण ३५ खासगी रुग्णालयांची पाहणी

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट सूरू आहे. शिवसेनेसह पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दखल घेत महापालिकेनेही रुग्णांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी डॅशबोर्डची निर्मिती केली. महापालिकेच्या संकेतस्थळावर असलेल्या डॅशबोर्डच्या माध्यमातून रुग्णालयांमध्ये किती खाटा आहेत, राखीव खाटा किती आहेत, व्हेंटिलेटर, दर व दाखल रुग्णांची माहिती मिळून पारदर्शकता निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु खासगी रुग्णालयांकडून यासंदर्भात कुठलीच दखल घेतली न गेल्याने अखेर थेट रुग्णालयात घुसून तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लेखा परीक्षक बी. जी. सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय विभागाचे अधिकारी, उपायुक्त व कर्मचाऱ्यांचे सोळा पथक तयार करून गुरुवारी रात्री उशिरा खासगी रुग्णालयांमध्ये पाठविले. अशोका मेडिकव्हर, वोक्हार्ट, सह्याद्री, सिक्स सिग्मा या मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांसह एकूण ३५ खासगी रुग्णालयांची पाहणी केली. 

अशी झाली तपासणी 

वैद्यकीय बाबी तपासण्यासाठी एक डॉक्टर, कागदपत्रे तपासणीसाठी लेखा विभागाच्या कर्मचाऱ्यांचा पथकामध्ये समावेश होता. पथकातील प्रत्येक व्यक्ती पीपीई कीट घालूनच रुग्णालयात गेला. वेळेवर उपलब्ध असलेले डॉक्टर, रेमडीसेवर औषधांची उपलब्धता, रुग्णाशी संवाद साधून दिल्या जाणाऱ्या सुविधा आदींची पाहणी केली. यात शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. कोरोनाची गंभीर परिस्थिती असल्याने रुग्णालयांना शासन निर्देश पाळण्याची एक संधी दिली जाणार आहे. 

अशा आढळल्या अनियमितता 

- उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांवर उपचार 
- कोविड रुग्णांची माहिती महापालिकेला कळविली नाही 
- व्हेंटिलेटरची संख्या अपुरी 
- कोविड उपचारासाठी राखीव खाटांची माहिती महापालिकेला कळविली नाही 
- रुग्णालयाच्या दर्शनी भागावर दरसूची न लावणे 

खासगी रुग्णालयासंदर्भात वाढत्या तक्रारी लक्षात घेता पथके तयार करून रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती प्राप्त झालेल्या माहितीची छाननी सुरू करून अनियमितता आढळलेल्या रुग्णालयांवर कारवाई करू. - राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT