Measles Disease esakal
नाशिक

Measles Disease : नाशिक जिल्ह्यात गोवरसाठीही आता विलगीकरण कक्ष

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यात गोवर नियंत्रणासाठी विलगीकरणाची व्यवस्था करावी असे निर्देश गोवर प्रतिबंध व नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत दिल्यानंतर आरोग्य विभागाने सर्व जिल्हा परिषद, महापालिका प्रशासनाला तशा सूचना केल्या आहेत. यानुसार जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारले आहेत. यात गोवरसदृश्य रुग्णांना ठेवले जाणार आहेत. दुसरीकडे, गत आठवड्यात पाठविण्यात आलेले ९ नमुने निगेटिव्ह आले. सर्वेक्षणात आढळलेल्या १० रुग्णांचे नमुने तपासणीसाठी अहमदाबाद (गुजरात) येथे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हर्षल नेहते यांनी दिली.

मुंबई, भिवंडी भागात गोवरचे रुग्ण आढळून आले असून काही बालकांचा मृत्यूही झाल्याची नोंद आहे. नाशिक जिल्ह्यातही या आजाराने शिरकाव केला असून, ग्रामीण भागात १० तर शहरी भागात ५ संशयित बालके आढळून आली आहेत. गोवरसदृश रुग्णांची संख्या १० वर पोचल्याने जिल्हा परिषदेची आरोग्य विभाग सतर्क झाला. तपासणीसाठी पाठविण्यात आलेले १० पैकी ९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. येवला येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह होता. मात्र, योग्य उपचार पद्धतीनंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे.

हेही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

गोवरवर नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरण व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना टास्क फोर्सने दिले आहेत. या निर्देशानुसार, ग्रामीण भागातील उपजिल्हा रूग्णालयात, ग्रामीण रूग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. याशिवाय जिल्हा रूग्णालयात देखील कक्ष स्थापन केला असून येथे गोवर रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. गोवर आजार फैलावत असल्याने रुग्णाचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. गत तीन ते चार दिवसात झालेल्या सर्वेक्षणात पुन्हा १० रूग्ण गोवर सदृश आढळले आहेत. यांचे नमुने तपासणीसाठी अहमदाबाद येथे पाठविले असून दोन दिवसात अहवाल प्राप्त होईल, असे डॉ. नेहते यांनी सांगितले.

कुपोषित बालकांवर लक्ष केंद्रित

टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीत कुपोषित बालकांमध्ये गोवर आजाराची गुंतागुंत होऊन ते त्यांच्या जिवावर बेतू शकते, असे लक्षात घेऊन आपल्या भागातील कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करून या बालकांना आवश्यक पोषण आहार व जीवनसत्त्व अ चा डोस द्यावे अशा सूचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात देखिल कुपोषित बालकांवर लक्ष केंद्रित केले आहेत. कुपोषित बालकांची संख्या लक्षात घेऊन त्यांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती डॉ. नेहते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT