temple.jpg 
नाशिक

दारू दुकाने उघडता, मग मंदिरांची दारे बंद का? 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / पंचवटी : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. महसूल मिळावा म्हणून एकीकडे प्रशासनाने राज्यभरातील दारूची दुकाने खुली केलेली आहेत. दुसरीकडे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे अद्यापही कुलूपबंदच असून, ती त्वरित खुली करावी, अशी मागणी गंगा गोदावरी पुरोहित संघाने सोमवारी (ता. 11) जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

त्यामुळे भाविकांत प्रचंड नाराजी

याबाबत पुरोहित संघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे शहरातील व पंचवटीतील अनेक जण सकाळी स्नान करून, सुचिर्भूत होऊन मंदिरात जाऊन देवदर्शन व पूजाअर्चा करून मगच अन्न ग्रहण करतात. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंचवटीतील बहुसंख्य मंदिरे बंदच आहेत. त्यामुळे भाविकांत प्रचंड नाराजी आहे. भाविकांच्या आग्रहास्तव व श्रद्धेसाठी काही काळ का होऊना मंदिरे खुली करावीत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

44 हजारांचा निधी सुपूर्द 
गंगा गोदावरी पुरोहित संघ आणि शुक्‍ल यजुर्वेदिय माध्यंदिन ब्राह्मण संघ या संस्थांतर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीस प्रत्येकी अकरा, असे 22 हजार व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 22 हजार असे 44 हजार रुपयांचा निधी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी दोन्ही संस्थांचे अध्यक्ष सतीश शुक्‍ल, शुक्‍ल यजुर्वेदिय संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. भानूदास शौचे, तुषार जोशी, अनिल देशपांडे उपस्थित होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indra Nooyi India Remarks : भारत घाण देश, तिथे असते तर पेप्सिकोची सीईओ कधीच झाले नसते... इंद्रा नूयी यांनी गायले चीनचे गोडवे

Kolhapur News : आबाजीच गोकुळचे ‘बाप’, अरुण डोंगळेंच्या विधानाने नव्या वादाला तोंड; दूध उत्पादक सभासदांना कमी लेखण्याचा प्रकार

Croatia vs Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार की स्वप्नांचा चुराडा होणार? दोन दिग्गजांची कसोटी

Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

SCROLL FOR NEXT