iti.jpg 
नाशिक

'आयटीआय' प्रवेश अर्ज दुरूस्‍तीसाठी शनिवारपर्यंत मुदतवाढ

अरुण मलाणी

नाशिक : आरक्षणाच्‍या मुद्यावरुन विविध अभ्यासक्रमांप्रमाणेच औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था (आयटीआय) च्‍या प्रवेशाची प्रक्रिया रखडली आहे. पहिल्‍या फेरीचे प्रवेश झालेले असतांना, यापुढील फेरींमध्ये सहभागी होऊ इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जात दुरूस्‍तीची संधी उपलब्‍ध करून दिली आहे. त्‍यानुसार इच्‍छुक विद्यार्थ्यांना येत्‍या शनिवार (ता. १४) पर्यंत प्रवेश अर्जात दुरूस्‍ती करता येईल.

शनिवारी सायंकाळी पाचपर्यंतची वेळ 
 
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्‍यातर्फे यासंदर्भात सूचना जारी केली आहे. दुसऱ्या फेरीकरीताचे सुधारीत वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे. प्रथम प्रवेश फेरीत प्रवेशीत उमेदवारांव्यतिरीक्त सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रवेश अर्जात सादर केलेल्या माहितीत दुरुस्ती करण्यासाठी मुदत दिला होता. गेल्‍या १७ सप्‍टेंबरपासून उमेदवारांना अर्जात दुरूस्‍तीची संधी दिली होती. तर येत्‍या शनिवारी (ता.१४) सायंकाळी पाचपर्यंत अर्जात दुरूस्‍ती करता येईल. प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश करुन “Admission Activities - Grievance Redressal/ Edit Application Form” येथे क्लिक करावे. कोणत्याही प्रकारे अडचण असल्यास नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहाय्यता क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT