crime news friend murder his girlfriend and commit suicide aurangabad
crime news friend murder his girlfriend and commit suicide aurangabad esakal
नाशिक

जाधव पिता-पुत्राच्या मृत्यूचा उलगडा; बापानेच 17 वर्षीय मुलाचा आवळला गळा

योगेश मोरे

म्हसरूळ (जि. नाशिक) : पंचवटी परिसरात राहत्या घरात बाप आणि मुलगा यांचे मृतदेह आढळल्यानंतर या घटनेचा उलगडा करण्यात पंचवटी पोलिसांना यश आले आहे. हट्टी स्वभाव, हात उगारणे, उलटून बोलणे आणि शिवीगाळ करणाऱ्या मुलाच्या त्रासाला कंटाळून नैराश्य आलेल्या बापानेच त्याचा गळा आवळून खून (Murder) आणि त्यानंतर बापाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत जगदीश जाधव यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Jadhav father son death mystery reveals father killed his 17 year old boy )

सितागुंफाजवळील रेवास्वामी अपार्टमेंट येथे गुरुवारी (ता.१९) सकाळी जगदीश पुंडलिक जाधव (वय ४८), प्रणव जगदीश जाधव (१७) या दोघांचे मृतदेह बैठक खोलीत आढळून आले. जाधव हे पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत तर मुलगा प्रणव हा सोफ्यावर मृत अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांना शुक्रवारी (ता.२०) जाधव बाप-लेकांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यात जगदीश जाधव यांनी गळफास घेत आत्महत्या तर प्रणवचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले. या अनुषंगाने पोलिसांनी शोभा जगदीश जाधव यांची चौकशी केली. त्यात धक्कादायक माहिती समोर आली. पती जगदीश यांनीच प्रणवचा खून करून आत्महत्या केल्याचे सांगितले.

प्रणवचा हट्टी स्वभाव होता. तो उलटे बोलायचा, हात उगारायचा, शिवीगाळ करायचा. त्यास आई- वडिलांनी समजावले होते. तरीही, त्याच्यात काही फरक पडला नव्हता. त्याचा त्रास असह्य झाल्याने जगदीश जाधव यांनी प्रणवला कळवण येथील होस्टेलवर ठेवले होते. तरीही, त्याच्यात काही सुधारणा झाली नाही. त्याच्या त्रासाला कंटाळून आणि नैराश्य आल्याने जगदीश यांनी प्रणवचा झोपेतच गळा आवळून खून केला. या प्रकरणी मयत जगदीश जाधव यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रणजित नलावडे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT