Jalyukta Shivar Yojana
Jalyukta Shivar Yojana esakal
नाशिक

Jalyukta Shivar Scheme : 183 कामांतून जलयुक्त शिवार योजना पाणीदार; 16 गावात होणार जलसंधारणाची कामे

संतोष विंचू

Nashik News : टंचाई दूर करणे, गावे पाणीदार करणे आणि जलसंधारणाला बळकटी देण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार अभियान पुन्हा बाळसे धरु लागले आहे. योजनेतंर्गत तालुक्यातील १६ गावात १८३ कामे होणार आहेत.

यासाठी तब्बल ८ कोटी ९४ लाखाचा खर्च प्रस्तावित असून या कामांमुळे पाणी आडवा पाणी जिरवा, जलसंधारणाला बळ द्या हा हेतू साध्य व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ( Jalyukta Shivar Yojana out of 183 works Water conservation works will be done in 16 villages of Yeola Nashik News)

भाजप-शिवसेना सरकारने जलयुक्त शिवार अभियान पुन्हा नव्या जोमाने कार्यरत केले आहे. त्या जलयुक्त शिवार २.० योजनेत निवड झालेल्या जिल्ह्यातील २३१ गावांमध्ये जलसंधारणाची २ हजार ९४३ कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यासाठी २०६ कोटींच्या खर्चास व या आराखड्यास योजनेच्या जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली आहे.

तालुक्यातील आहेरवाडी, एरंडगाव खुर्द, एरंडगाव बुद्रुक, कानडी, कोटमगाव बुद्रुक, खैरगव्हाण, गोपाळवाडी, नायगव्हाण, पिंपळखुटे खुर्द, बदापूर, भुलेगाव, मातुलठाण, रायते, लहीत, शिरसगाव लौकी या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

मुळात तालुका अवर्षणप्रवण व दुष्काळी असल्याने येथे पावसाचे पडलेले पाणी अडवून जिरविणे गरजेचे आहे. कितीही पाऊस झाला तरी तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील पाणी वाहून जाते परिणामी दिवाळीनंतरच पाणी टंचाई भेडसावू लागते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यापूर्वीही पहिल्या जलयुक्त शिवार योजनेची अनेक कामे झाली, पण त्यामुळे अधिकाधिक क्षेत्र ओलीताखाली आणणे आणि गावे टँकरमुक्त करणे शक्य झालेले नाही. आता दुसऱ्या टप्प्यात तब्बल १८३ कामे होणार आहेत.

मात्र यात कृषी व वन विभागाची सर्वाधिक कामे होणार आहेत. पावसाचे पाणी अडवून जलसंधारणाला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाकडून ढोसकामे तालुक्यात धरले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे वन विभागात तब्बल ६९ कामे धरली आहे, परंतु त्या कामाचा कितपत फायदा होईल हा प्रश्नच आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिलेल्या आराखड्यानुसार जिल्ह्यात मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद जलसंधारण विभाग, उपवनसंरक्षक विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग व कृषी विभाग जलयुक्त शिवार योजनेची कामे करणार आहेत.

वन विभागाच्या कामाचा लाभ किती ?

मागील पंधरा-वीस वर्षापासून पूर्व भागातील वनहद्दीत जलसंधारणाची कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहे. निव्वळ वृक्षारोपणासाठी कोटींचा खर्च गेले अनेक वर्ष होतो. मात्र वनहद्दीत झालेल्या कामांचा लाभ कमी अन गमती जमती अधिक होत असल्याच्या तक्रारी होतात.

किंबहुना मागील काही वर्षात झालेली अनेक कामे तर जागेवर सापडत नसल्याची स्थिती आहे. म्हणूनच प्रत्येक उन्हाळ्यात वन्यप्राणी व हरणांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते, अन टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो.

मग झालेल्या कामाचा फायदा किती हा प्रश्न आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये पाण्यात घालण्यापेक्षा पाणी वाचविण्यासाठी वन विभागाऐवजी लघुपाटबंधारे विभागामार्फत पावसाच्या क्षेत्रात जलसंधारणाची कामे धरली जावी अशी मागणी आहे.

अशी कामे...असा निधी...

विभाग प्रस्तावित कामे अंदाजित निधी

मृद व जलसंधारण विभाग १२ तीन कोटी ५० लाख

तालुका कृषी अधिकारी ८८ , ८८ लाख

लघु पाटबंधारे उपविभाग १४ दोन कोटी ८८ लाख

वन परिक्षेत्र अधिकारी ६९ एक कोटी ६८ लाख

एकूण कामे १८३ , ८९४ कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT