Vicky Chavan
Vicky Chavan esakal
नाशिक

Nashik News : हरनूलचे जवान चव्हाणांना कुस्ती सरावावेळी वीरमरण

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : हरनूल (ता. चांदवड) येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलात असलेले जवान विक्की अरुण चव्हाण (वय २५) यांचे कुस्तीचा सराव सुरू असताना शनिवारी (ता. ९) निधन झाले.

श्रीनगरला कार्यरत असताना त्यांना वीरमरण आले. चव्हाण यांच्या निधनामुळे कुटुंबासह संपूर्ण हरनूल गावावर शोककळा पसरली. (Jawan Chavan died during wrestling practice nashik news)

बारावी उत्तीर्ण झाल्यावर विक्की चव्हाण हे भारतीय लष्करात दाखल झाले. सध्या ते श्रीनगर येथील पूंछ- राजोरी येथे महार रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. ते स्वतः कुस्तीपटू असल्याने अनेक स्पर्धांच्या निमित्ताने सराव करीत असत.

शुक्रवारी (ता. ८) रात्री कुस्तीचा सराव सुरू असताना त्यांचे निधन झाले. विक्की यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड झाली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे ते रोजच कुस्तीचा सराव करीत असत. या स्पर्धेच्या तयारीसाठी शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ते कुस्तीचा सराव करीत असताना ही दुर्घटना घडली.

त्यांच्या मागे आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, त्यांचे पार्थिव रविवारी (ता. १०) मुंबई विमानतळावर आणण्यात येईल. त्यानंतर ते हरनूल येथे मूळ गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT